Thursday, August 20, 2026
Homeक्राईमNashik Crime : दुर्दैवी घटना! बाप-लेकाची रेल्वेखाली आत्महत्या; कारण काय?

Nashik Crime : दुर्दैवी घटना! बाप-लेकाची रेल्वेखाली आत्महत्या; कारण काय?

चांदवड | वार्ताहर | Chandwad

तालुक्यातील तळेगाव रोही शिवारातून (Talegaon Rohi Shivar) जाणाऱ्या रेल्वे रुळावर येवला तालुक्यातील धुळगाव येथील कृषी व रासायनिक खते व्यावसायिक वाल्मीक दौलत गायकवाड (४४) यांनी त्यांचा चार वर्षाचा मुलगा राजेशसह आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

या घटनेबाबत चांदवड पोलिसांत तळेगाव रोहीचे पोलीस पाटील अविनाश आहिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या डाउन लाईन वर शनिवार (दि २८) रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास येवला तालुक्यातील धूळगाव येथील वाल्मीक दौलत गायकवाड व त्यांचा चार वर्षाचा मुलगा राजेश वाल्मिक गायकवाड याच्यासमवेत धावत्या रेल्वेखाली आल्याने त्यांच्या डोक्यास व हाता पायास गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू (Death) झाला.

दरम्यान, या दोघा बापलेकांनी रेल्वेखाली आत्महत्या (Train Suicide) का केली? याचे कारण अजून समजू शकले नाही. कष्टाळू असलेल्या वाल्मीकने शून्यातून वर येत स्वतः शेती करून शेतकऱ्यांना (Farmer) औषधे विक्री करायचे. नुकतीच त्यांनी नवीन गाडी घेऊन मुलाबरोबर स्वतःचेही स्वप्न पूर्ण केल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. या घटनेप्रकरणी अधिक तपास चांदवड पोलीस (Chandwad Police) करीत आहेत. वाल्मिक आणि राजेशवर धुळगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

ताज्या बातम्या

Shirdi : अमेरिकेतील युद्धाच्या धोरणामुळेच डांबराची टंचाई

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धधोरणामुळे आणि पश्चिम आशियातील तणावामुळे डांबराची टंचाई निर्माण होऊन नगर-मनमाड महामार्गाचे काम संथगतीने सुरू असल्याच्या आपल्या...