Friday, April 3, 2026
Homeक्राईमNashik Crime : 'बंटी-बबली'कडून ९३ लाखांची फसवणूक

Nashik Crime : ‘बंटी-बबली’कडून ९३ लाखांची फसवणूक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

घर खरेदीच्या आमिषाने ऑटो कन्सल्टंटसह पाच जणांची तब्बल ९३ लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केली. याप्रकरणी कमोदनगर परिसरातील ‘बंटी बबली’ जोडीविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

विजय शांतीलाल पाटणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई (Action) करण्यात आली. फिर्यादीनुसार, सन २०२२ मध्ये इंदिरानगर परिसरात घर घेण्यासाठी पाटणी यांनी ओळखीच्या ऐश्वर्या रवी गायकवाड हिच्याकडे मदत मागितली. तिने तिचा नातेवाईक दीपक दत्तात्रय देवळे याची पाटणी यांच्याशी ओळख करून दिली. देवळेने स्वतःचा कमोदनगरमधील फ्लॅट विक्रीस असल्याचे सांगून ४९ लाख ९० हजारांमध्ये व्यवहार ठरवला.

पाटणी यांनी विविध वित्तसंस्थांकडून २५ लाखांचे कर्ज काढले. त्यापैकी ९ लाख ५८ हजार रुपये देवळेच्या खात्यात ऑनलाईन पाठवले तर ९ लाख ७४ हजार रुपये रोख स्वरुपात ऐश्वर्या गायकवाडकडे देवळेसाठी दिले. याशिवाय देवळेने पाटणी यांच्या एचडीएफसी क्रेडिट कार्डावरून ७ लाख ६८ हजार रुपये खर्च केले. तसेच १ लाख २० हजार रुपये त्यांच्या मित्राच्या खात्यातूनही देवळेला पाठवण्यात आले. अशा प्रकारे एकूण २८ लाख २० हजार रुपये पाटणी यांच्याकडून संशयितांनी स्वीकारले.

दरम्यान, फ्लॅटचा व्यवहार पुढे न्यायच्या नावाखाली देवळेने उडवाउडवीची उत्तरे देत पाटणी यांच्या सह्या घेतल्या. अखेर चौकशीअंती समजले की संबंधित फ्लॅट संशयित देवळेने परस्पर दुसऱ्यालाच विकला आहे. दरम्यान, ऐश्वर्या गायकवाड हिने इतर तीन व्यक्ती रोहिणी खैरनार (७) लाख १० हजार), रेखा मोहिते (७लाख ७० हजार) आणि पद्मिनी व भूषण वारे (४७ लाख १३ हजार ७४ रुपये) तसेच धरमवीरसिंग किर (२) लाख ५० हजार) यांचीही फसवणूक केल्याचा खुलासा झाला.

ताज्या बातम्या

बिबट्याच्या

Leopard Attack: पिंपळणारे येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकर्‍याचा मृत्यू

0
दिंडोरी । प्रतिनिधीदिंडोरी तालुक्यातील पिंपळणारे येथे सकाळी 8.30 वाजता 69 वर्षीय शेतकर्‍यावर बिबट्याने हल्ला करुन ठार केले आहे. या घटनेने शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले...