नाशिक | प्रतिनिधी | Nashik
बालविवाह केल्याच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या पतीच्या जामीनासाठी (Bail) धावाधाव करणाऱ्या अठरा वर्षीय पत्नीवर (Wife) तिच्या सख्ख्या नातलगासह त्याच्या सराईत व तडिपार मित्रांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना पंचवटीतील चोपडा लॉन्स रोडवरील एचपी पेट्रोलपंपामागील गव्हाच्या शेतात घडली आहे. पीडितेने स्वच्छतागृहात जाण्याचे कारण साधून संशयितांच्या तावडीतून सुटका करत नाशिकरोड पोलीस ठाणे (Nashik Road Police Station) गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा नोंद करुन तपासासाठी पंचवटी पोलिसांकडे (Panchvati Police) वर्ग केला आहे. पाच संशयितांपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. इतरांचा शोध सुरु आहे
अमित विजय दामले (वय २५, रा. व्हाईट हाउसच्या मागे, मिशन मळा, शरणपूररोड नाशिक), गोपाल राजेंद्र नागोलकर (वय २५, रा. भंडारे किराणा दुकानाजवळ बेथलेनगर, शरणपूररोड), दिलीप विष्णू गायकवाड (वय २८, रा. सिध्दार्थनगर, कॉलेजरोड, नाशिक), गोप्या आणि अनोळखी संशयित अशी पाच जणांची नावे आहेत. मुंबईतील अंधेरी येथील सुभाषनगर एमआयडीसी येथे राहणाऱ्या अल्पवयीन युवतीने विकास गायकवाड (वय २८ रा. आनंदवल्ली, गंगापूररोड, नाशिक) याच्याशी काही महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. मात्र, त्याविरोधात ६ मुलीच्या कुटुंबाने बाल विवाह व अन्य कलमांची फिर्याद नोंदविल्याने त्याला अटक करुन न्यायालयाच्या आदेशाने तुरुंगांत (Jail) डांबण्यात आले. सध्या तो आर्थररोड कारागृहात असून त्याला जामीन मिळवून देण्यासाठी विकासच्या सख्खा नातलग असलेल्या दिलीप विष्णू गायकवाड याने पीडित महिलेस फोन करून नाशिकला (Nashik) बोलावले. पतीला जेलबाहेर काढायचे असल्याने ती बुधवार (दि. २२) सकाळी अंधेरीतून नाशिकला आली.
यावेळी शालिमार (Shalimar) येथे दिलीप गायकवाड, मित्र गोप्या आणि अजून एक संशयित असे तिघे पीडितेला भेटले. त्यांनी तिला रिक्षामध्ये बसवून ‘जामीनदार होणाऱ्या व्यक्तीशी भेट घालून देतो’, असे सांगत रामवाडी रोडवरील चोपडा लॉन्स ते ड्रीम कॅस्टल रस्त्यावरील एचपी पेट्रोलपंपाच्या मागील गव्हाच्या शेतालगतच्या झाडाझुडपांमध्ये नेले. या तिघांनी काहीतरी नशा करुन संशयितांनी तिला जेवायला सांगितले. मात्र, तिने नकार दिल्याने झाडाला बांधून ठेवले. त्यानंतर दुपारी दीडनंतर तिघापैकी एका संशयिताने पीडितेच्या डोक्यात बाटली मारली. त्यानंतर दिलीप गायकवाड याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. यावेळी इतर दोघा संशयितांनी (Suspected) तिचे हातपाय धरून मारहाण (Beating) केली. यानंतर, पीडिता बेशुद्ध झाली. तपास महिला उपनिरीक्षक अश्विनी पाटील करत आहेत.
शुद्धीवर येताच संधी साधली
दरम्यान, (दि. २३) रोजी सकाळी पीडिता शुद्धीवर आली. तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पुन्हा या तिघांनी दिला मारहाण केल्याने बेशुद्ध झाली. दुपारी साडेचार वाजेपर्यंत हे नराधम तिला मारहाण करीत होते. त्यानंतर हे तिघे मद्य पित बसले. तेव्हा पीडितेने वॉशरूमला जायचे असल्याचे सांगितले. यावेळी संशयितांपैकी एक जण तिच्यासोबत होता. याचाच फायदा घेत पीडितेने त्याला धक्का देत पळ काढत नाशिकरोड पोलीस ठाणे गाठले आणि पोलीस ठाण्यात या तिघा नराधमांविरोधात फिर्याद दाखल केली.