Friday, May 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजParth Pawar: VSR कंपनीच्या विमानातून प्रवास का केला? पार्थ पवारांनी सांगितलं कारण,...

Parth Pawar: VSR कंपनीच्या विमानातून प्रवास का केला? पार्थ पवारांनी सांगितलं कारण, म्हणाले, विमानाची व्यवस्था…

पुणे | Pune
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव तथा राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांच्या विमान प्रवासाने विविध चर्चांना उधाण आले आहे. पार्थ पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास केला. पण याच कंपनीच्या विमानातून प्रवास करताना अजित पवार यांचे अपघाती निधन झाले होते. अजित पवारांच्या अपघातानंतर या कंपनी विरोधात आमदार रोहित पवार यांनी कारभाराचे वाभाडे काढले. त्यांनी विमान अपघात नसून घातपात असल्याचा आरोप केला. या विमान कंपनी विरोधात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक आरोप केले. तर विमान अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी ते आक्रमक झाले. हे सर्व प्रकार घडत असतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि दादांचे चिरंजीव खासदार पार्थ पवार यांनी VSR कंपनीच्या विमानातून प्रवास केल्याचे समोर आले आहे. असे असताना पार्थ पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवास केल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रश्न उपस्थित केले होते. याच प्रश्नांवर आता पार्थ पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

- Advertisement -

अंजली दमानिया काय म्हणाल्या?
“ज्या VSR च्या विमानात वडील गेले, ज्या VSR कंपनीच्या चौकशीची मागणी होत आहे, त्या विमानात मुलगा जातो? चौकशीची मागणी करायचे सोडून, त्याच विमानात पार्थ पवार निर्धास्तपणे जातो? सुनेत्रा पवारांचे OSD, राम चौबे आणि विकास पाटील, जे सरकारी अधिकारी आहेत आणि सरकारी पगार घेतात, ते पुन्हा एकदा पवारांच्या घरासाठी काम करत आहेत? मी पुन्हा एवढ्यासाठी म्हणत आहे कारण, हेच ते दोघे जे पुणे मुंढवा जमीन प्रकरणात पार्थच्या बाजूने उभे होते. तेव्हा अजित पवारांचे PA, आता सुनेत्रा पवारांचे? प्रश्न साधे आहेत. सरकारी अधिकारी खाजगी कामासाठी कसे जाऊ शकतात? चार्टर फ्लाइटचे पैसे कुणाच्या खिशातून? आणि VSR च्या त्याच विमानात पार्थ पवार बसले तरी कसे? उत्तरं जनतेला हवीत”, असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत. त्यांच्या प्रश्नांना आता पार्थ पवार यांनी उत्तर दिलं आहे.

Vidhan Parishad Election: ‘बॉस इज ऑलवेज राईट’…; विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्याची सुचक पोस्ट, नेमका अर्थ काय?

पार्थ पवारांचे काय स्पष्टीकरण?
“मोदी बाग, पुणे येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटण्यासाठी तातडीने पोहोचायचे असल्याने मी माझ्या कार्यालयाला विमानाची व्यवस्था करण्यास सांगितले होते. शेवटच्या क्षणी झालेल्या व्यवस्थेमुळे नकळतपणे VSR Aviation चे विमान माझ्यासाठी बुक करण्यात आले. विमानतळावर पोहोचेपर्यंत आणि विमानापर्यंत जाईपर्यंत हे विमान VSR Aviation चे असल्याची मला कोणतीही कल्पना नव्हती”, असे पार्थ पवार यांनी स्पष्ट केले आहे.

“ही केवळ प्रशासकीय पातळीवरील चूक होती. याची मी गंभीर दखल घेतली असून संबंधित विमान बुक करणाऱ्या एजंटशी असलेला करार आम्ही तत्काळ रद्द करत आहोत. तसेच माझ्या कर्मचारीवर्गाला आणि सहकाऱ्यांना अशा प्रकारच्या चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी अधिक सतर्क राहण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत”, असे पार्थ पवार यांनी सांगितले.

VSR बाबत पार्थ पवारांचं मोठं भाष्य
“VSR Aviation बाबत बाबत यापूर्वीची आमची भूमिका आजही कायम आहे. आमचा स्पष्ट विरोध आहे आणि पुढेही तसाच राहणार आहे. यावरून निर्माण केला जाणारा वाद पूर्णपणे निराधार, दिशाभूल करणारा आणि दुर्दैवी आहे. सत्य परिस्थिती समजून न घेता यावर राजकारण करण्याचा प्रयत्न योग्य नाही”, अशी भूमिका पार्थ पवार यांनी मांडली आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : उपोषण स्थगित करण्याची आज विनंती करणार – ना. विखे...

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरून त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही. समाजाच्या मागण्यांबाबत सरकारकडून सकारात्मक कार्यवाही सुरू असून आज...