Monday, May 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Crime : फेसबुकवर ओळख; पाच तोळे सोने लांबविले

Nashik Crime : फेसबुकवर ओळख; पाच तोळे सोने लांबविले

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik

फेसबुकवरून (Facebook) झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत, देवदर्शनासाठी मुक्कामी थांबलेल्या तरुणानेच घरातून पाच तोळे वजनाच्या नऊ सोन्याच्या अंगठ्चा आणि सात हजार रुपये रोख असा ऐवज चोरून नेल्याची घटना जय भवानीनगर परिसरात (Bhavani Nagar Area) घडली.

- Advertisement -

याप्रकरणी चंद्रशेखर प्रेमसिंग नवले (वय ४१, रा. जय भवानीनगर, आगरटाकळी रोड, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आकाश सिंह (वय २०, रा. दिल्ली) याची त्यांच्याशी फेसबुकद्वारे ओळख झाली होती. १२ डिसेंबर २०२४ रोजी आकाश सिंह देवदर्शनासाठी नाशिक येथे आला असता, तो नवले यांच्या घरी मुक्कामी थांबला होता. त्याच दिवशी सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास नवले व आकाश हे दोघे नवले यांच्या बहिणीच्या घरी जेवणासाठी गेले होते.

जेवणानंतर वडिलांचा फोन आला आहे असे सांगून आकाश लगेच नवले यांच्या घरी निघून गेला. त्याची बॅग घेत दिल्लीला निघून गेला. काही दिवसांनंतर नवले यांच्या लक्षात आले की, घरातील पाच तोळे वजनाच्या नऊ सोन्याच्या अंगठ्या आणि सात हजार रुपये चोरून नेले आहेत, या प्रकरणी नवले यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात (Upnagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शशिकांत पवार करीत आहेत.

ताज्या बातम्या

Shrirampur : रेल्वेखाली चिरडून तरुण-तरुणीचा मृत्यू

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur तालुक्यातील खंडाळा (Khandala) शिवारातील यादव बाबा मंदिराजवळील रेल्वे (Railway) मार्गावर रविवारी पहाटे तरुण-तरुणीचे मृतदेह (Youth and Young Girl Dead Body) रेल्वेखाली चिरडलेल्या...