Sunday, June 14, 2026
Homeक्राईमNashik Crime : 'तो' जीएसटी अधिकारी निलंबित

Nashik Crime : ‘तो’ जीएसटी अधिकारी निलंबित

नाशिक | Nashik

उद्योजकाकडून (Entrepreneur) ५० लाख रूपयांची मागणी करुन २२ लाख रूपयात तडजोड करत ५ लाख रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर न्यायालयीन कोठडीची (Judicial Custody) हवा खाणारा नाशिकचा सेंट्रल जीएसटी अधिक्षक यास निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्याचे बँक खाते व मालमत्ता याची चौकशी करण्यासाठी सीबीआय सज्ज झाली आहे.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, जिल्ह्यातील एका उद्योजकाकडून जीएसटीमध्ये (GST) अनियमितता केली अशी भीती तथ्यहीन अर्जाच्या आधारे दाखवून ५० लाख रुपयांची मागणी सेंट्रल जिएसटी अधिक्षक हरी प्रकाश शर्मा यांनी केली होती. यानंतर तडजोडीअंती २२ लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यापैकी ५ लाख रुपये रोख उद्योजकाकडून मंगळवार (दि.१४) रोजी लाच घेताना सिबीआय पुणे यांनी सापळा रचून शर्मा यास जेरबंद केले होते. त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यावर विशेष न्यायालयाने युक्तीवाद ऐकून शर्मा याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. शर्मासोबत आलेल्या तीन निरीक्षक यांची चौकशी प्रलंबित आहे.

भारत सरकारच्या वित्त मंत्रालय, राजस्व विभाग, केंद्रीय वस्तु सेवाकर तथा केंद्रीय उत्पादन शुल्क,आयुक्त कार्यालय नाशिक या कार्यालयाचे आयुक्त प्रदिप गुरुमुर्ती सीजीएसटी व सिक्स नाशिक यांनी याची गंभीर दखल घेऊन हरी प्रकाश शर्मा या लाचखोराच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. त्यानुसार शर्मा याच्याविरोधात सीबीआयकडे (CBI) दाखल एफआयआर नुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ ,(अॕजअमेंडेड २०१८) द्वारे पुणे सिबीआय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शर्मा यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यात अटक केल्यानंतर दोन दिवासांची पोलिस कोठडी देण्यात आली होती.

त्यानंतर ४८ तास यास पूर्ण झाल्याचे पत्र सीबीआय माहिती विभागाकडून (CBI Department) जाहीर करण्यात आले. त्या आधारे शर्मा यास संबधित विविध कलमान्वये निलंबित करण्यात आले. तसेच नाशिक येथील मुख्यालय वरीष्ठ अधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय सोडू नये असे स्पष्ट आदेशात नमूद करण्यात आले आहे. शर्मा यांच्याबरोबर आलेले अखिलेश,विशाल व अर्पीत या तीन अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीची शक्यता असून, त्यांना चौकशी कामी पाचारण करण्याची आहे. तर शर्मा यांच्या बँक खाते व मालमत्ता यावर टाच येण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : महायुतीची ‘सेफ हाऊस’ पॉलिटिक्स; शिवसेनेनंतर भाजपचेही...

0
नाशिक | Nashik स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर महायुतीने (Mahayuti) आपल्या नगरसेवकांना एकत्र ठेवण्याची रणनीती आखली आहे. शिवसेनेचे (शिंदे...