Wednesday, April 1, 2026
Homeक्राईमNashik Crime : अवैध सावकारी भोवलीच; सराईत सावकार मैंद अटकेत

Nashik Crime : अवैध सावकारी भोवलीच; सराईत सावकार मैंद अटकेत

तक्रार करण्याचे आवाहन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अवैधरित्या सावकारी थाटून मुंबईतील (Mumbai) पोलीस कर्मचाऱ्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणात उपनगर पोलिसांनी (Upnagar Police) अखेर भाजपच्या राजाश्रयाखालील कैलास मैंद या सराईतास शुक्रवारी (दि. ७) अटक केली आहे. दरम्यान, त्याच्या दोघा साथीदारांचा शोध सुरु असून मैदच्या पत्नीला या कारवाईने धक्का बसला आहे, तर युनिट एकमध्ये मैंदचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्याने ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ अशी घोषणा दिली.

- Advertisement -

मुंबई पोलीस दलातील (Mumbai Police Force) अमलदार हेमंत कृष्णा कापसे (वय ४१, रा. चिनार, भगवा चौक, अरिंगळे मळ्याजवळ, जेलरोड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, ३० जून २०२२ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत खंडणी मागितल्यासह अवैधरित्या कर्जवसुली केल्याप्रकरणात उपगर पोलिसांत संशयित मैंदसह संतोष कुशारे व फरान सैय्यद याच्याविरोधात हा गुन्हा नोंद आहे. जेलरोड येथील शेलार मळ्यातील हरिविहार सोसायटीत मैंद याचे कार्यालय असून, हेमंत कापसे यांनी गेल्या तीन वर्षांपूर्वी मैंदकडून अडीच लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्याबदल्यात मैंद याने कापसेकडे सव्वा दोन लाख ७५ हजारांची खंडणी (Extortion) मागितली.

दरम्यान, हे पैसे न दिल्यास कापसेसह कुटुंबास संपविण्याची धमकी दिली, असा दावा कापसे यांनी फिर्यादीत केला आहे. त्यासोबतच, सप्टेंबर २०२२ मध्ये मैंद गँगने पन्नास हजार रुपये जबरीने घेतल्याचे नमूद आहे. गुरुवारी रात्री फिर्याद दाखल होत असतानाच पोलिसांनी मैंदला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. त्याचे साथीदार कुशारे व सैय्यद यांचा शोध सुरु आहे. कैलास मैंद (Kailas Maind) याला न्यायालयाने पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.

मैंदच्या पत्नीवरही गुन्हा

सराईत सावकार कैलास मैंदला अटक केल्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकच्या कार्यालयात आणण्यात आले. तेथे त्याचा सत्कार झाल्यावर मैंदची पत्नी सारीका आणि इतर उपस्थित होते. त्यांनी पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करून अडथळा निर्माण केला. कार्यालयात गदारोळ घातल्याने संशयित महिला अमलदार सारिका मैंद हिच्यासह साथीदारांविरुद्ध सरकारवाडा पोलिसांत शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला.

अशीही चर्चा

कापसे याने त्याची एक कार ओळखीतून मैंदकडे अडीच लाख रुपयांत गहाण ठेवली आहे. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये नाशिक शहर पोलिसांनी गुन्हेगारीमुक्त नाशिकसाठी कायद्याचा बालेकिल्ला मोहीम सुरु केली. याच मोहिमेत तक्रार करेल, माझी कार परत कर, असे म्हणून कापसे याने मैंदवर पोलिसी दबाब टाकल्याने खंडणीचा हा गुन्हा नोंद झाल्याची चर्चा उपनगर पोलीस ठाणे आवारात शुक्रवारी ऐकावयास मिळाली.

मुद्दे

  • कैलासची पत्नी सरकारी सेवेत
  • कुशारे व सैय्यदने कापसेला वारंवार फोन करुन धमकावल्याचा दावा
  • मैंदवर सन २०१८ पासून खंडणी व तद्संबंधी पाच गुन्हे
  • कुशारेवर सन २०१८ मध्ये खंडणीचा गुन्हा

ताज्या बातम्या

संपादकीय : १ एप्रिल २०२६ – संघर्षाकडून शांततेकडे…

0
भारतीय लोकशाहीच्या प्रवासात अंतर्गत सुरक्षेपुढील सर्वात भीषण, क्रूर आणि रक्तपाती आव्हान म्हणून ओळखला जाणारा नक्षलवाद आता अंताच्या उंबरठ्यावर उभा आहे. एकेकाळी पशुपतीपासून तिरुपतीपर्यंत पसरलेला...