Wednesday, April 1, 2026
Homeक्राईमNashik Crime : पवार गँगचा 'ऑपरेटर' अटकेत; पाटणकरचा खून करण्यासाठी गोळीबार करुन...

Nashik Crime : पवार गँगचा ‘ऑपरेटर’ अटकेत; पाटणकरचा खून करण्यासाठी गोळीबार करुन पळ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शरणपूर रोडवरील (Sharanpur Road) बेथेलनगरातील सराईत गुंड हर्षद पाटणकरला (Harshad Patankar) संपविण्यासाठी साथीदारांसह बेथेलनगरात चाल करुन गोळीबार करणारा ‘पवार गँगचा म्होरक्या राहुल मच्छिंद्र पवार याला अखेर गुन्हेशाखा युनिट एकने अटक (Arrested) केली आहे.

- Advertisement -

सोमवारी (दि. ३) गोळीबारासह तोडफोड करुन पळ काढल्यानंतर नांदगावातील नातलगांकडे आश्रय घेतलेल्या राहुलला रविवारी (दि. ९) अटक करण्यात आली. दरम्यान, या गुन्ह्यात अन्य तिघे पसार असून त्यांचा शोध सुरु आहे. हर्षद हा सराईत असून त्याचा पूर्वाश्रमीचा मित्र राहुल पवार यांच्यात काही महिन्यांपासून वर्चस्ववाद, दहशतीतून खटके उडाले आहेत. कॅनडा कॉर्नर, शरणपूरसह अन्य भागांत ‘आमचेच वर्चस्व आहे’ हे दाखविण्यासाठी दोन्ही टोळ्या एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरल्या असून त्याचीच परिनिती म्हणून ३ नोव्हेंबरच्या रात्री बेथेलनगरात टोळीयुद्धासह गोळीबाराचा भडका उडाला.

रिक्षा चालक मायकल भंडारे (वय ५१) यांच्या फिर्यादीनुसार, भूषण पवार, रोशन शिंदे, ओम जगताप, प्रेम जगताप, अजय देवरे, विक्की गुंजाळ, राहुल पवार यांच्यासह इतर संशयितांविरुद्ध बेथेल नगरात हातात कोयते, चॉपर, दांडक्यांनी गल्लीत उभ्या असलेल्या दोन रिक्षांसह काही दुचाकींची तोडफोड केली. काही नागरिकांच्या घरावर काचेच्या बाटल्या फेकून शिवीगाळ करीत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. यासह भंडारे यांना ‘तुझा गेम वाजवतों’, असे धमकावून कोयता उगारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. गोळीबारात पवार गँगचा सक्रिय सदस्य भूषण रोहीदास पवार (वय २८) हा जखमी झाला होता. तर, तपासात, हर्षद पाटणकरचा खून करण्याच्या उद्देशाने हा हल्ला झाल्याचे उघड झाले होते.

त्यानंतर, सरकारवाडा पोलिसांनी (Sarkarwada Police) पवार गँगचे अजय मोहन देवरे (वय २१), भारत अंबादास कुन्हाडे (वय १९), विकी अनिल गुंजाळ (वय १८), प्रेम सुनील जगताप (वय १९), मोहित संतोष जगताप उर्फ ओम (वय २०) यांना अटक करून एका विधिसंघर्षितासही ताब्यात घेतले होते. तर, शनिवारी (दि. ८) गँगचा सहावा सदस्य संशयित लंबोदर फसाळे याला तालुक्यातील धोंडेगावातील जंगलातून अटक करण्यात आली होती. त्याचवेळी त्याचा साथीदार रोशन शिंदे पळून जाण्यात यशस्वी झाला. दरम्यान, राहुल पवार हा गोळीबारानंतर नांदगावात असल्याची माहिती गुन्हेशाखेच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार, पथकाने सापळा रचून त्याला गजाआड केले.

पोलीस बनले गावकरी

राहुल नांदगावात असल्याचे कळताच गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेने युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. आंचल मुदगल यांनी पथकास नांदगावात खाना केले. पथकातील उपनिरीक्षक चेतन श्रीवंत आणि अमलदारांनी अविरत ६० तास परिसरातील शेतमळे व इतर लोकवस्तीत वेशांतर केले, पवार नांदगावातील नातलगांकडून छ. संभाजीनगर जिल्ह्यात पसार होत असल्याचे कळाल्यावर नेमके ठिकाण यातून गावकऱ्यांच्या वेशात सापळा रचला. तो हाती येत असतानाच त्याने दुचाकीवरून पळून जाण्याच्या प्रयत्न केला, मात्र, पथकाने ९ किलोमीटरपर्यंत पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

मुद्दे

  • पाटणकरवर सातहून अधिक गंभीर गुन्हे
  • हर्षदचे मित्र वेदांत चाळगे, गोपाल नागोरकर, शॉन मायकल, जॉय मायकल, रॉबिन्सन बत्तीसे, वैमव खंडारे, विकास नेपाळी, वेदांत चाळगे (सर्व रा. बेथेलनगर) हे अनेक गुन्ह्यांत संशयित
  • पवारसह गँगचे सदस्य गोळीबार, हल्ले, दहशतीच्या विविध गुन्ह्यांत संशयित
  • पवार सध्या बेरोजगार, पूर्वी करायचा खरेदी-विक्रीचे व्यवहार

ताज्या बातम्या