Wednesday, December 4, 2024
Homeक्राईमNashik Crime News : तीन कट्टे, घातक हत्यारे जप्त; परिमंडळ दाेनमध्ये कारवाई

Nashik Crime News : तीन कट्टे, घातक हत्यारे जप्त; परिमंडळ दाेनमध्ये कारवाई

१९८ संशयितांच्या घरांची झडती

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी परिमंडळ-२ कार्यक्षेत्रात राबविलेल्या अवैध शस्त्रसाठा शोध मोहिमेत ३ गावठी कट्टे व ९ घातक हत्यारे जप्त केले. तरम रेकॉर्डवरील १९८ गुन्हेगारांच्या घरझडत्या घेण्यात आल्या. याप्रकरणी १२ गुन्हे दाखल (Case Filed) करण्यात आले आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : देवळाली मतदारसंघात आ. सरोज आहिरेंचा झंझावात

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्या सूचनेने परिमंडळ-२ मध्ये उपायुक्त माेनिका राऊत यांच्यासह सहायक आयुक्त डाॅ. सचिन बारी व वरिष्ठ निरीक्षकांनी पथकांना निर्देश दिले. विधानसभा निवडणूक कालावधीमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार, तडीपार, घातक हत्यारे, अग्निशस्त्र बाळगून गुन्हे करणारे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करुन दहशत निर्माण करणार्‍या गुन्हेगारांना अचानकपणे कोम्बिंग, ऑलआउट, नाकाबंदी कारवाईत तपासणी केली जाणार आहे.

हे देखील वाचा : Nashik Political : वसंत गिते विक्रमी मतांनी जिंकणार; शिवसेना उपनेते सुनील बागुल यांना विश्वास

याशिवाय, गुन्हेगारांच्या घडझडत्या व डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करुन परिणामकारक कारवाई केली जाणार आहे, असे मोनिका राऊत (Monika Raut) यांनी सांगितले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या