Friday, May 1, 2026
Homeक्राईमNashik Crime : गुंडांच्या सोशल मीडियावरही 'स्ट्राइक'; दहा सराईतांवर गुन्हे

Nashik Crime : गुंडांच्या सोशल मीडियावरही ‘स्ट्राइक’; दहा सराईतांवर गुन्हे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील (City) वाहतूक बेटांसह दिशादर्शक फलक, कमानींसह प्रमुख चौकांत पुन्हा उफाळलेल्या बॅनरबाजीमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींची ‘चमकोगिरी’ वाढत असल्याने पोलीस आयुक्तालयाने (Police Commissioner) कठोर भूमिका घेतली आहे. शहर पुन्हा ‘बॅनरमुक्त’ करण्यासाठी संबंधितांवर गुन्हे नोंदवून बॅनरबाजी दूर करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत. त्यानुसार, पोलिसांनी सराईत गुंड राकेश कोष्टीसह गणेश वाघ, कुंदन परदेशीवर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे राकेश कोष्टीसह त्याचे साथीदार व अन्य अजय संजय आठवले, मंगेश पांजंगे यांच्यावर गुन्हेगारी वर्तनाचे व्हिडिओ बनवून ते व्हायरल करीत दहशत पसरविल्याचे स्वतंत्र गुन्हे (Case) दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्रिमूर्ती चौक ते उंटवाडी, दिव्या अॅडलॅब परिसर, पवननगर आदी भागात संशयित गणेश उर्फ आप्पा सुरेश वाघ व राकेश उर्फ आण्णा तुकाराम कोष्टी या दोन्ही सराईत गुन्हेगारांचे फोटो असणारे बॅनर झळकत होते. विनापरवानगी लावण्यात आलेले हे बॅनर्स (Posters) पोलिसांनी शनिवारी (दि.४) उत्तरवून दोघांविरुद्ध महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरण प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंदविला.

कोष्टी यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर ‘जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे माथाडी कामगार आघाडी नाशिक असा उल्लेख आहे. कोटींविरुद्ध सन २००६ पासून खुनासह विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत. इन्स्टाग्रामवर गुन्हेगारीबाबत समाजात भीतीचे वातावरण तयार करुन दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. कोष्टी व कावळे हा काही महिन्यांपासून एका गुन्ह्यात जामीनावर (Bail) मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आहेत.

कोणतेच बॅनर नको!

महापालिकेने निश्चित केलेल्या जागेव्यतिरिक्त इतरत्र कोणत्याही स्वरुपाचे बॅनर नसावे, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. वाढदिवसांसह इतर कार्यक्रमांच्याही बनरला ‘कात्री’ लावण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यातच वाढदिवसांच्या शुभेच्छांसाठी ‘भाऊ, दादा’ व गुन्हेगारांचे बॅनर असल्यास त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद होणार आहे.

यांच्यावर दाखल झाले गुन्हे

  • कुंदन सुरेश परदेशी हा खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा झालेला आरोपी असून त्याने पंचवटी पोलिसांच्या हद्दीतील मखमलाबाद रोडवरील हनुमानवाडी, ड्रिम कॅसल सिग्नलजवळ स्वतःचे बॅनर लावून दहशत पसरविली.
  • सुशांत शांताराम नाठे या सराईताने आङगाव पोलिसांच्या हद्दीतील कोणार्कनगर येथील साक्षी फ्लोअर मिलजवळ विनापरवाना व अवैधरित्या सार्वजनिक ठिकाणी स्वतःचे बॅनर झळकावले.
  • सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी व गणेश सुरेश वाघ यांनी अंबड पोलीसांच्या हद्दीतील महाकाली चौक येथे अवैधरित्या सार्वजनिक ठिकाणी स्वतःचे बॅनर लावून दहशत पसरविली.
  • राकेश सोनार याने सातपूर पोलिसांच्या हद्दीतील जाधव कॉलनीतील दत्तमंदिर चौकाजवळ अवैधरित्या स्वतःचे बॅनर लावले.
  • दिनेश जगन जाधव व बाळा जगन जाधव या सराईतांनी नाशिकरोड पोलिसांच्या हद्दीत स्वतःचे बॅनर लावून विद्रुपीकरण केले.
  • करण शलपाल पारचे या फर्नाडीसवाडीतील सराईताने रेजिमेंटल प्लाझा कॉर्नरजवळील रिक्षा स्टॅन्ड येथे बॅनर लावून दहशत माजविली.
  • अंबड हद्दीत बाळा मुरलीधर नागरे (रा. नागरे मळा, पिंपळगांव बहुला) या सराईताने, २ सप्टेंबर रोजी म्हाडा कॉलनीतील जाधव संकुल येथे महादेव फाउंडेशन प्रणित शिल्पकार युवक मित्र मंडळाचा बॅनर लावून विद्पीकरण करीत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.
  • म्हसरुळ हद्दीत अमोल किशोर फल्ले (वय २५, रा. बालाजी विहार, गामणे मळा मखमलाबाद) या सराईताने ४ सप्टेंबर रोजी किशोर सूर्यवंशी मार्गावरील ओमकार चौक शुभेच्छाचे बॅनर लावून दहशत माजविली.

किती गुन्हे दाखल ?

१) धिंगाणा घालणाऱ्या मद्यपींवर गुन्हा – १६

२) स्टॉप अँड सर्च कारवाई – २३०

३) टवाळखोर कारवाई – ४९

४) हिस्ट्रिशीटर संशयित तपासणी – १०

५) रेकॉर्डवरील संशयित तपासणी – १५

६) तडीपार ताब्यात – ६

७) नाकाबंदी – ७

८) समन्स, वॉरंट बजावणी – १६

९) ‘शैल्स’वरून दहशत – २

१०) नियमांचे उल्लंघन – १३

ताज्या बातम्या

Rohit Pawar : उन्हात होरपळ, विजेचा खेळखंडोबा; आ. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली...

0
जामखेड । तालुका प्रतिनिधी कर्जत-जामखेड तालुक्यातील तीव्र वीजटंचाई आणि अनियमित वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर आज आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात...