Wednesday, June 17, 2026
Homeक्राईमNashik Crime : नाशिककर चौतीस कोटींच्या फसवणुकीचे धनी; सायबर गुन्ह्यांचा ट्रेन्ड बदल

Nashik Crime : नाशिककर चौतीस कोटींच्या फसवणुकीचे धनी; सायबर गुन्ह्यांचा ट्रेन्ड बदल

शेअर बाजाराचे आमिष भोवले

नाशिक | भारत पगारे | Nashik

शहरात सन २०२२ मध्ये सायबर फसवणुकीचे (Cyber Fraud) २६ गुन्हे नोंद होऊन नाशिककरांचे (Nashik) केवळ ९२ लाख रुपये उकळण्यात आले होते. मात्र, वर्ष बदलले तसे सायबरचे वाढते गुन्हे, त्यांचा ट्रेन्ड आणि फसवणुकीतील रकमेचा आकडा फुगल्याचे दिसून आले आहे. सन २०२४ मध्ये ९४ गुन्हे दाखल होऊन नाशिककरांचे ५४ कोटी रुपये लाटण्यात आले होते. चालूवर्षी जुलै २०२५ पर्यंत दाखल ६५ सायबर गुन्ह्यांत चोरट्यांनी (Thieves) नाशिककरांच्या ३३ कोटी ७२ लाख रुपयांवर डल्ला मारला आहे.

- Advertisement -

कमी कालावधीत श्रीमंत होण्यासह पैशांच्या (Money) हव्यासापोटी शेअर बाजारात गुंतवणूक आणि दामदुप्पट परताव्याच्या आमिषाला भुलून मागील सात महिन्यांत नाशिककरांनी (Nashik) १२ कोटी रुपये गमावले आहेत. त्यासोबतच, विविध स्वरुपाच्या सायबर गुन्ह्य ‘तुमचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत, आधारकार्ड सापडले आहे, तुम्ही बेकायदेशीर आर्थिक व्यवहार केल्याचे पुरावे सापडले आहेत’, असे भासवून होम अरेस्ट करीत सायबर चोरट्यांनी भीती दर्शवून व बनावट ई-मेलद्वारे साडेपाच कोटी रुपयांची लूट केली आहे. एकूण सायबर गुन्ह्यांमधून मागील सहा ते साडेसहा महिन्यांत नाशिककरांची ३३ कोटी ७२ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.

दरम्यान, पोलीस आयुक्तालयाच्या शहर सायबर पोलीस ठाण्यातील (Cyber Police Station) नोंदीनुसार सन २०२५ मध्ये ऑगस्टपर्यंत विविध स्वरुपाचे ६५ गुन्हे नोंद झाले असून, त्यामध्ये ३३ कोटी ७२ लाख ४४ हजार रुपये सायबर चोरट्यांनी उकळले आहेत. तर सन २०२४ मध्ये शेअर गुंतवणुकीच्या (Share Investment) नावे ३९ गुन्हे नोंद असून, ३० कोटी १० लाख १५ हजार ३९६ रुपयांची फसवणूक झाली. हीच फसवणूक यंदाच्या ७ महिन्यांत वीस गुन्ह्यांत १२ कोटी ७२ लाख ४ हजार १८० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे सायबर चोरट्यांमार्फत होणारी लूट रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर वाढत असताना सायबर सजगतेतून ही फसवणूक रोखण्याची जबाबदारी नागरिकांवर आहे.

वर्षनिहाय सायबर गुन्हे

सन गुन्हे फसवणुकीची रक्कम रुपये
२०२२ २६ ९२ लाख
२०२३ ६५ ६ कोटी ९७ लाख
२०२४ ९४ ५४ कोटी ६८ लाख ८६ हजार ६३४
प्रकार (सन २०२५ )गुन्हे फसवणुकीची रक्कम रुपये
शेअर बाजार गुंतवणूक २० १२ कोटी ७२ लाख ४ हजार १८०
बनावट ई-मेल ५ कोटी ४३ लाख २२ हजार ९३७
फ्रॉड कॉल ४ कोटी ५८ लाख ३३ हजार २२४
टेलिग्राम जॉब फ्रॉड३ कोटी ७० लाख २३ हजार १९५
क्रिप्टोकरन्सी १ कोटी ७२ लाख ९६ हजार ६०
होम अरेस्ट २४ ८२ लाख ५० हजार ७८६

ताज्या बातम्या

नाशिकमध्ये पाणीकपातीचा निर्णय; जून-जुलै महिन्यात दर शनिवारी पाणीपुरवठा राहणार बंद

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik अल-निनोमुळे राज्यात पावसाला झालेला उशीर आणि धरणांमधील पाणीसाठा यांचा विचार करता नाशिक महापालिकेने पाणीकपातीचा मोठा निर्णय घेतला आहे.नाशिकमध्ये जून आणि जुलै...