Sunday, June 14, 2026
Homeक्राईमNashik Crime : कुरिअर कंपनीतून 'इतक्या' लाखांचे नवेकोरे मोबाईल लांबविले; दीड तासांत...

Nashik Crime : कुरिअर कंपनीतून ‘इतक्या’ लाखांचे नवेकोरे मोबाईल लांबविले; दीड तासांत सुनियोजित चोरी

नाशिक | Nashik

शहरात एका कुरिअर कंपनीला लक्ष्य करून चोरट्यांनी (Thieves) पुन्हा एकदा चोरी केली. मुंबईनाका पोलिसांच्या (Mumbai Naka Police) हद्दीतील कुरिअर कंपनीचा गाळा फोडून चोरट्यांनरी तब्बल ३२ लाख १७ हजार रुपयांचे १६० सीलपॅक अर्थात नवेकोरे मोबाईल फोन चोरून नेल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईनाका पोलिसात गुन्हा दाखल असून सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणानुसार चोरट्यांचा माग काढला जात आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : चौक सभेदरम्यान मंत्री महाजनांशी बाचाबाची

गजानन धोंडू होनपारखी (रा.धवल मंगल कार्यालयामागे, समता चौक, सिडको) यांनी फिर्याद दाखल केली आहे. मुंबईनाका येथील किनारा हॉटेलजवळील माधव प्लाझा इमारतीत ‘एसएमई-कार्गो’ प्रा. लि. या कुरिअर कंपनीचे कार्यालय आहे. अज्ञात चोरट्यांनी ९ आणि १० जानेवारीदरम्यान गाळ्याचे शटर कशाच्या तरी सहाय्याने वाकवून आत प्रवेश केला. यानंतर आतमधील विवो कंपनीच्या सोळा बॉक्समधील सीलपॅक १६० नवीन मोबाईलचे कार्टून चोरून नेले. रविवारी (दि. ११) सकाळी नेहमीप्रमाणे कुरिअरचे कार्यालय उघडण्यात आले तेव्हा शटर तोडल्याचे दिसून आले.

हे देखील वाचा : Nashik MC Election : नाशकात ऐन थंडीत राजकीय वातावरण तापले; ‘आप’च्या उमेदवारावर ताणली बंदूक!

यानंतर आत पाहणी केली असता मोबाईल फोनचे (Mobile Phone) बॉक्स गायब असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर मुंबईनाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक समद बेग करत आहेत. प्राथमिक तपासात ही चोरी माहीतगार व्यक्ती आणि स्थानिक चोरट्यांनी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार आता परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि संशयास्पद हालचालींचा तपास केला जात आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime : ‘बर्गमेन’वरील स्नॅचर अखेर सापडला; इराणी टोळीतील सराईत कल्याणमधून ताब्यात

यापूर्वीही गोदामांमधून मोबाईल चोरून नेण्याच्या घटना

शहरात यापूर्वीही अशाच पद्धतीने कुरिअर व गोदामांमधून मोठ्या प्रमाणात नवे कोरे मोबाईल चोरून नेण्याच्या घटना घडल्या होत्या. त्या प्रकरणांपैकी अनेक गुन्हे उघडकीस आले असून, त्याच गुन्ह्यातील काही ‘कनेक्शन’ या चोरीशी आहे का याची पडताळणी केली जात आहे. एवढ्या मोठ्या किमतीचा मोबाईलसाठा चोरीला गेल्याने कुरिअर कंपन्यांच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्या

Shivsena UBT MP Meeting : ‘मातोश्री’वरील बैठकीला कोणत्या खासदाराची उपस्थिती अन्...

0
मुंबई | Mumbai गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात ठाकरे सेनेचे खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्या...