Thursday, November 26, 2026
Homeक्राईमNashik Crime News : पंधरा लाखांचा लोखंडी माल गायब! कृषी औद्योगिक सहकारी...

Nashik Crime News : पंधरा लाखांचा लोखंडी माल गायब! कृषी औद्योगिक सहकारी संघाच्या गोडाऊनमधून अपहार; तत्कालीन गोडाऊन किपरविरुद्ध गुन्हा

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

​शहरातील द्वारका पॉईंट परिसरातील (Dwarka Point Area) कर्मवीर भाऊसाहेब हिरे जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाच्या गोडाऊनमधून १५ लाख १३ हजारांचे भंगार परस्पर विक्री करून संस्थेची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. संस्थेने केलेल्या अंतर्गत तपासणीत साहित्यात तफावत आढळून आल्यानंतर हा अपहार उघडकीस आला. या प्रकरणी तत्कालीन गोडाऊन किपर संशयित निंबा देविदास शेवाळे याच्याविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गैरव्यवहारात त्याला अन्य कोणी मदत केली आहे का, या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.  

- Advertisement -

​दिलीप सुखदेव गाडेकर (वय ५४, रा. धर्माजी कॉलनी, सातपूर) यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द्वारका पॉईंट, मुंबई-आग्रा रोड येथील कृषी भवन संस्थेच्या गोडाऊनमध्ये दि. ३१ मार्च २०२६ ते दि. १२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला. संस्थेच्या विविध विभागातील लोखंडी पत्रे, पाईप आणि इतर शेतीपयोगी साहित्याच्या संरक्षणाची आणि देखरेखीची जबाबदारी तत्कालीन गोडाऊन किपर निंबा देविदास शेवाळे याच्यावर सोपवण्यात आली होती.

मात्र, शेवाळे याने पदाचा गैरवापर करत संस्थेच्या मालकीचे हे सर्व साहित्य बेकायदेशीरपणे परस्पर विल्हेवाट लावून विक्री केले आणि त्यातून मिळालेली १५ लाख १३ हजार ५०० रुपयांची रक्कम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरून संस्थेचे नुकसान केले. ​दरम्यान, संस्थेमार्फत गोडाऊनमधील साहित्याची तपासणी करण्यात आली असता, प्रत्यक्ष साठा आणि नोंदींमध्ये १५ लाखांहून अधिक किमतीच्या साहित्याची तफावत आढळून आली.

या गंभीर प्रकारानंतर मुंबई नाका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(४) आणि ३१८(४) अन्वये गुन्हा (Case) नोंदवण्यात आला आहे. अद्याप या प्रकरणात आरोपीला अटक (Areested) करण्यात आलेली नसून, सहायक पोलीस निरीक्षक गावित तपास करत आहेत. चार महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या या अपहारात गोडाऊन किपर एकटाच सहभागी होता की संस्थेतील किंवा बाहेरील अन्य कोणाची त्याला साथ मिळाली, तसेच गायब झालेला लोखंडी माल नेमका कोणाला विकला गेला, याचा शोध पोलीस (Police) घेत आहेत.

मुद्दे

भंगार खरेदी करणाऱ्या व्यावसायिकाची चौकशी
३१ मार्च २०२६ ते १२ ऑगस्ट २०२६ या कालावधीतील घटना
१५,१३,५०० रुपयांचा एकूण ​अपहार
लोखंडी पत्रे, पाईप व शेतीपयोगी साहित्याचा समावेश
गोडाऊन किपरला कोणी मदत केली का याचा शोध

ताज्या बातम्या

गोकुळच्या

गोकुळच्या सत्तासंघर्षात कोर्टाचा महायुतीच्या वकिलांना इशारा; १६ संचालकांना नोटीस, पुढील सुनावणी...

0
कोल्हापूर | Kolhapurकोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या सत्तासंघर्षात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान महायुतीच्या वकिलांच्या भूमिकेवर न्यायालयाने नाराजी...