Thursday, November 26, 2026
Homeक्राईमNashik Crime News : स्टोअरवरील बनावट ॲपचा फटका; ५०० पट मार्जिन अन्...

Nashik Crime News : स्टोअरवरील बनावट ॲपचा फटका; ५०० पट मार्जिन अन् करमुक्त ट्रेडिंगचे जाळे, एकास पाच लाखांचा गंडा  

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik 

शेअर बाजारात (Share Market) झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवून सायबर गुन्हेगारांनी आता हाय-टेक डब्बा ट्रेडिंगचे नवे जाळे विस्तारले आहे. सेबीची (एसईबीआय) कोणतीही परवानगी नसताना गुगल प्ले-स्टोअरवर बनावट ॲप आणि वेबसाइट उपलब्ध करून ५०० पट मार्जिन व करमुक्त ट्रेडिंगचे खोटे आमिष दाखवत नाशिकमधील एका गुंतवणूकदाराची ५ लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सायबर चाेरट्यांनी (Cyber Thives) ट्रेड बाजार या नावाने बनावट वेबसाइट आणि अँड्रॉइड ॲप तयार केले. गुगल प्ले-स्टोअरवर हे ॲप उपलब्ध असल्याने गुंतवणूकदारांचा त्यावर विश्वास बसला. त्यानंतर व्हॉट्सॲप आणि ई-मेलच्या माध्यमातून संपर्क साधून कोणताही कर न भरता ट्रेडिंग करण्याची आणि गुंतवलेल्या रकमेच्या तब्बल ५०० पट मार्जिन मिळवून देण्याचे आमिष दाखविले. या आमिषाला बळी पडून शहरात राहणाऱ्या तक्रारदाराने २ ते ७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ५ लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने वर्ग केले. ही रक्कम सुरत डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खात्यात स्विकारण्यात आली.

विशेष म्हणजे, कोणताही अधिकृत स्टॉक एक्स्चेंज व्यवहार न करता केवळ ॲपवर बनावट (Fake App) इलेक्ट्रॉनिक नोंदी दाखवून नफा होत असल्याचा आभास निर्माण करण्यात आला. प्रत्यक्षात पैशांचा (Money) अपहार झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने पोलिसांत धाव घेतली. याबाबत(दि. २४) सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये ट्रेड बाजार लिमिटेड या डेव्हलपरसह संशयितांचे सात व्हॉट्सॲप क्रमांक, ई-मेल आयडी आणि सुरत येथील बँक खातेधारकाचा समावेश आहे. भारतीय न्याय संहिता कलम, माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि रोखे करार (नियमन) कायदा, १९५६ अंतर्गत गुन्हा नाेंद करण्यात आला असून, वरिष्ठ पाेलीस निरीक्षक सुशीला कोल्हे तपास करत आहेत.

​सावधगिरीचा इशारा

कोणतीही अधिकृत बँक (Bank) किंवा सेबी नोंदणीकृत ब्रोकर कधीही ५०० पट मार्जिन किंवा करमुक्त शेअर ट्रेडिंगची हमी देत नाही. गुगल प्ले-स्टोअरवर दिसणारे प्रत्येक फायनान्स ॲप सुरक्षित असतेच असे नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित कंपनीची सेबीच्या अधिकृत वेबसाइटवर खात्री करावी आणि अनोळखी बँक खात्यांत पैसे पाठवणे टाळावे, असे आवाहन पाेलिसांनी केले आहे.

मुद्दे

​- प्ले-स्टोअरवरील बनावट ट्रेडिंग ॲपचा सुळसुळाट
​– ५०० पट मार्जिनचे अवास्तव आमिष
​- करमुक्त व्यवहाराच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दिशाभूल
– पाच दिवसांत पाच लाखांचा ऑनलाइन गंडा
– फसवणुकीच्या रकमेचे सुरत कनेक्शन
– अधिकृत एक्स्चेंजविना बनावट इलेक्ट्रॉनिक नोंदींचा खेळ
​
– रोखे करार कायद्यान्वये सायबर पोलिसांत गुन्हा

ताज्या बातम्या

गोकुळच्या

गोकुळच्या सत्तासंघर्षात कोर्टाचा महायुतीच्या वकिलांना इशारा; १६ संचालकांना नोटीस, पुढील सुनावणी...

0
कोल्हापूर | Kolhapurकोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या सत्तासंघर्षात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान महायुतीच्या वकिलांच्या भूमिकेवर न्यायालयाने नाराजी...