Friday, June 19, 2026
Homeक्राईमNashik Crime News : जमिनीच्या वादातून ६५ वर्षीय शेतकऱ्याचा खून

Nashik Crime News : जमिनीच्या वादातून ६५ वर्षीय शेतकऱ्याचा खून

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

तालुक्यातील जांबुटके (Jabutek) येथे जमिनीच्या वादातून ६५ वर्षीय शेतकऱ्याचा खून (Farmer Murder) करून मृतदेह गोणीत लपवून ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे जांबुटके गावात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, जांबुटके शिवारात योगेश कराटे (३५) व भाऊसाहेब अपसुंदे यांचा रस्त्यावरून वाद होता. त्यामुळे भाऊसाहेब अपसुंदे (६५) यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात (Dindori Police Station) तक्रार दाखल केली होती.

त्याचबरोबर योगेश कराटे यांनी सुद्धा गुरुवार (दि. २८) रोजी फिर्याद दाखल केलेली होती. संध्याकाळी दोघे भेटले असता योगेश कराटे यांनी भाऊसाहेब अपसुंदे यांना घरी नेले. तेथे वाद होऊन अपसुंदे यांचा खून केल्याचा संशय आहे.

दरम्यान, खून केल्यानंतर भाऊसाहेब यांचा मृतदेह गोणीत भरून ठेवला होता. रात्री पोलिसांनी (Police) घटनास्थळी भेट दिली असता मृतदेहा शेजारी पावडे व रक्ताने भरलेला दांडा सापडला. यानंतर मृतदेह (Dead Body) दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात (Dindori Rural Hospital) उत्तरिय तपासणीसाठी पाठविण्यात आला.

ताज्या बातम्या