घोटी | वार्ताहर | Ghoti
येथील हरिहर किल्ल्यावरून (Harihar Fort) पर्यटन (Tourist) आटोपून परतणाऱ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या (Student) टेम्पो ट्रॅव्हलरला अडवून चालकाला बेदम मारहाण आणि वाहनाची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घोटी-त्र्यंबकेश्वर मार्गावरील (Ghoti-Trimbakeshwar Road) बोरीचीवाडी परिसरात रविवार (दि. ९ ऑगस्ट)रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या घटनेने पर्यटकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणी घोटी पोलिसांनी (Ghoti Police) तत्परतेने कारवाई करत सर्व १० संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.संशयितांनी टेम्पो ट्रॅव्हलरला (केए ०१ एडी ००५६) अडवून आणि दुचाकीवरून पाठलाग करत चालक नागरज जगदीश गिरेगौड (वय २७, रा. कर्नाटक) यांना खाली उतरवून मारहाण (Beating) केली. त्यांनी वाहनावर दगडफेक करत लाथा बुक्क्यांनी पुढील काच, उजव्या बाजूचा आरसा, छताचे भाग आणि मागील बंपर फोडून नुकसान करण्यात आले.
दरम्यान, घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन अजय चंद्र गांगड, आकाश दिलीप जाधव, अक्षय देवराम जाधव, देविदास मधुकर जाधव, अमोल जाधव, गोपाळ जाधव, राहुल जाधव, दत्ता लोणे, साहील जाधव आणि साई जाधव (सर्व रा. बोरीचीवाडी) या संशयितांना ताब्यात घेतले. संशयितांविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील विविध कलमांन्वये (गुन्हा रजि. क्र. २७१/२०२६) गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रतीक भिंगारदे अण्णा गोवर्धने, बाळासाहेब आहेर, दिपक सांगळे, सनी भवर करत आहेत.




