Thursday, May 14, 2026
Homeक्राईमNashik Crime News : किरकोळ वादातून सराईताचा वार; सलून चालकाची निर्घृण हत्या

Nashik Crime News : किरकोळ वादातून सराईताचा वार; सलून चालकाची निर्घृण हत्या

आरोपी फरार, पहाटेच्या सुमारास थरार

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

पंचवटीतील गुन्हेगारीने (Panchvati Criminal Area) पुन्हा एकदा डोके वर काढले असून, आडगाव नाका परिसरातील (Aadgaon Naka Area) मधुर मिलन स्वीट्ससमोर शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास एका सलून चालकाची चाकूने भोसकून हत्या (Murder) करण्यात आली. जुन्या नाशिकमधील रहिवासी असलेले जयवंत यशवंत पवार (४५) असे मृताचे नाव आहे. किरकोळ वादातून झालेल्या या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली असून, संशयित आरोपी राजा काकवीपुरे हा घटनेनंतर फरार झाला आहे.

- Advertisement -

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, मृत जयवंत पवार यांचे अमरधाम रोडवर ‘तन्मय मेन्स पार्लर’ नावाचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री ८:३० च्या सुमारास ते घरातून दुचाकी घेऊन बाहेर पडले होते. रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने शोधाशोध सुरू असतानाच, ते मित्र विनोद आगळे उर्फ वस्ताद यांच्यासोबत असल्याचे समजले. पहाटे ३:३० च्या सुमारास जयवंत पवार आणि विनोद आगळे आडगाव नाक्यावरील मधुर मिलन स्वीट्स जवळ आले. त्याचवेळी तेथे टायर पंक्चरच्या दुकानाजवळ संशयित आरोपी राजा काकवीपुरे हा दारू पीत बसलेला होता. यावेळी विनोद आगळे आणि राजा यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली. जयवंत पवार यांनी मध्यस्थी करत आरोपीला हटकले असता, वादाचे रूपांतर झटापटीत झाले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत जयवंत यांच्या पत्नी गिता पवार (Gita Pawar) यांच्या फिर्यादीवरून संशयित राजा काकवीपुरे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेनंतर जुन्या नाशिकमधील पवार कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मृत जयवंत यांच्या पश्चात पत्नी गिता पवार, मुलगा तन्मय आणि आई असा परिवार आहे.

बुटातील चाकू काढला अन काळजाचा ठोका चुकला…

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, झटापट सुरू असताना संशयित राजा काकवीपुरे याने आपल्या बुटात लपवून ठेवलेला धारदार चाकू बाहेर काढला. त्याने केलेला पहिला वार हुकला, मात्र दुसरा वार जयवंत पवार यांच्या उजव्या बगलेखाली छातीवर वर्मी बसला. वार इतका भीषण होता की पवार रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळले. घटनेनंतर आरोपीने परिसरात दहशत माजवत तेथून एका दुचाकीस्वाराला धमकावून त्याच्या गाडीवर बसून पळ काढला. घटनास्थळी उपस्थित मित्रांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून पवार यांना अपोलो रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

सराईत गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

भरवस्तीत आणि मुख्य नाक्यावर पहाटेच्या वेळी अशा प्रकारे हत्या झाल्याने पंचवटीकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आरोपीने चाकू बुटात लपवून ठेवला होता, यावरून तो पूर्वतयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे.

ताज्या बातम्या

पडसाद : स्वेच्छानिवृत्तीचा दुष्काळात तेरावा!

0
'नाव सोनूबाई हाथी कथलाचा वाळा' ही म्हण नाशिकच्या महापालिकेला सध्यातरी तंतोतंत लागू पडते. कारण राज्यातील काही मोठ्या महापालिकांमध्ये नाशिकची गणना होते. सुमारे साडेतीन हजार...