
मनमाड | प्रतिनिधी | Manmad
किरकोळ कारणातून निर्माण झालेल्या वादातून टोळक्याने एका तरुणाचा (Youth) तलवार आणि कोयत्याने वार करून निर्घृणपणे खून केल्याच्या घटनेने शहर हादरले आहे. सुदर्शन सूरज चव्हाण असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. शहरातील ईदगाह भागात रविवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली मात्र तो पर्यत संशयित हल्लेखोर फरार झाले होते. दोन दिवसापूर्वीच मयत तरुणाचा साखरपुडा झाल्याचे समोर आले. या प्रकारणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.
हे देखील वाचा : Nashik News : दुर्दैवी घटना! दोन चिमुकल्यांचा हौदात बुडून मृत्यू
याबाबत समजलेले वृत्त असे की सुदर्शन सुरत चव्हाण (२८), आणि निलेश बगाडे, अविनाश बगाडे, तुषार गायकवाड (सर्व रा. ईदगाह) यांच्यात किरकोळ करणावरून वाद झाला वाद इतका विकोपाला गेला की संशयित हल्लेखोरांनी सुदर्शन चव्हाणवर तलवार आणि कोयत्याने हल्ला (Attack) करून सपासप वार केल्यामुळे सुदर्शनचा जागीच मृत्यू (Death) झाला. त्यानंतर सर्व संशयित फरार झाले.
हे देखील वाचा : Nashik News : सिडकोतील तरुणाचा अंबोली धरणात बुडून मृत्यू
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विजय करे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणी संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध घेतला जात आहे. इदगाह भागातील मध्यवस्तीत घडलेल्या या खुनाच्या (Murder Case) घटनेने परिसरातील जनतेत दहशतीचे वातावरण पसरले आहे.
हे देखील वाचा : Nashik News : रवींद्र एरंडेला सशर्त जामीन; नाशिक न्यायालयाचे फिर्यादीवर ताशेरे




