Wednesday, May 20, 2026
Homeक्राईमNashik News : रवींद्र एरंडेला सशर्त जामीन; नाशिक न्यायालयाचे फिर्यादीवर ताशेरे

Nashik News : रवींद्र एरंडेला सशर्त जामीन; नाशिक न्यायालयाचे फिर्यादीवर ताशेरे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

एका बाजूला कार्यालयातील ऑफिस बॉयने उघड केलेले नग्न फोटोंचे प्रकरण, तर दुसऱ्या बाजूला खंडणी आणि बलात्काराचे परस्परविरोधी आरोप… अशा नाट्यमय वळणावर असलेल्या कथित लैंगिक शोषण प्रकरणात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने (Nashik District Sessions Court ) पत्रकार संशयित रवींद्र एरंडे (वय ६३) याला (Ravindra Erande) सशर्त जामीन मंजूर केला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : दुर्दैवी घटना! दोन चिमुकल्यांचा हौदात बुडून मृत्यू

संशयित रवींद्र एरंडे यांच्याविरुद्ध सातपूर पोलिसांत (Satpur Police) बलात्कार आणि अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल आहे. फिर्यादीनुसार, २०१७ ते २०१८ दरम्यान एरंडे यांनी एका महिलेच्या मुलाला नोकरी लावण्याचे आमीष दाखवून, तिला इगतपुरी रोडवरील एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर जुलै २०२३ मध्ये सातपूर कॉलनीतील कार्यालयातही लैंगिक शोषण केल्याचा आरोप महिलेने केला होता.

न्यायालयीन (Hearing) सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने मांडलेला युक्तिवाद आणि घटनाक्रम पाहता या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. पीडित महिलेचा मुलगा हा संशयित एरंडे यांच्याच ऑफिसमध्ये काम करत होता. त्याने ऑफिसमधील एक टॅब चोरला होता. या टॅबमध्ये संशयिताचे काही आक्षेपार्ह (नग्न) फोटो होते. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्या मुलाने एरंडेंकडे तब्बल १२ लाख रुपयांची खंडणी (Extortion) मागितली होती.

हे देखील वाचा : Nashik News : सिडकोतील तरुणाचा अंबोली धरणात बुडून मृत्यू

दरम्यान, या खंडणीच्या त्रासाला कंटाळून एरंडे यांनी संबंधित मुलावर पोलिसांत (Police) गुन्हा दाखल केला. धक्कादायक बाब म्हणजे, मुलावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी त्याच्या आईने एरंडे यांच्याविरुद्ध फिर्याद दिली होती. रवींद्र एरंडे पोलीस आणि न्यायालयीन कोठडीत आहे.

महत्त्वपूर्ण निरीक्षण

मुलावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यावर लगेचच पुढच्या दिवशी पीडितेने एफआयआर दाखल करणे संशयास्पद आहे. हा खटला परस्पर वादातून आणि सूडभावनेतून दाखल केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुद्दे

  • तपास अधिकाऱ्यांनी प्रकरणाशी संबंधित सर्व वस्तू आणि मुख्य मुद्देमाल आधीच जप्त केला आहे.
  • रासायनिक विश्लेषण अहवाल येणे बाकी असला, तरी संशयिताला आता अधिक काळ तुरुंगात ठेवण्याची गरज नाही.
  • न्यायालयाने एरंडे यांची २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि काही कडक अटी-शर्तीसह सुटका करण्याचे आदेश दिले.

ताज्या बातम्या

पडसाद : राष्ट्रवादीतील मतभेदांना कांद्याचा तडका

0
कांदाप्रश्नाने नाशिकसह उत्पादक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पेट घेतल्याने विविध राजकीय पक्षही सक्रिय झालेले दिसतात. नेहमीप्रमाणे अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसने यात आघाडी घेतल्याचे दिसते. नाही म्हणायला...