Sunday, June 14, 2026
Homeक्राईमNashik News : सिडकोतील तरुणाचा अंबोली धरणात बुडून मृत्यू

Nashik News : सिडकोतील तरुणाचा अंबोली धरणात बुडून मृत्यू

त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar

तालुक्यातील अंबोली धरणात (Amboli Dam) मित्रांसोबत अंघोळीला गेलेल्या सिडकोच्या तरुणाचा (Cidco Youth) बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली आहे. विलास शिवाजी झोडगे असे मृत्यू (Death) झालेल्या युवकाचे नाव आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election 2026 : भाजप-शिंदेसेनेतच होणार लढत; भाजपचे १६४ तर शिंदेकडे १५९ संख्याबळ, सुनेत्रा पवारांची भूमिका महत्वाची

याबाबत पोलिसांकडून (Police) मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील सिडको येथील त्रिमूर्ती चौक (Trimurti Chowk) भागात राहणारे विलास शिवाजी झोडगे (वय ३५ वर्षे) हे आपल्या मित्रांसोबत त्र्यंबकेश्वर परिसरात फिरण्यासाठी आले होते. रविवार सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हे सर्व मित्र आंबोली धरण परिसरामध्ये पोहोचले. सर्व मित्रांनी धरणाच्या पाण्यात अंघोळ करण्याचा निर्णय घेतला. सर्व मित्र पाण्यात उतरले, अंघोळ करून सर्वजण सुखरूप बाहेरही आले. मात्र, यादरम्यान विलास झोडगे याने पाण्यात डुबकी मारली, ती त्याची शेवटचीच डुबकी ठरली.

हे देखील वाचा : Nashik News : दुर्दैवी घटना! दोन चिमुकल्यांचा हौदात बुडून मृत्यू

पाण्यात (Water) गेलेला विलास बराच वेळ बाहेर आलाच नाही, त्यामुळे सोबतच्या मित्रांमध्ये प्रचंड घबराट पसरली. मित्रांनी तातडीने आजूबाजूच्या लोकांना मदतीसाठी बोलावले आणि तात्काळ ११२ वर कॉल करून पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलीस (Trimbakeshwar Police) तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने विलास याला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्याला पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय त्र्यंबकेश्वर येथे दाखल करण्यात आले. डॉक्टर अभिजित नाईक यांनी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास तपासून त्याला मृत घोषित केले.

ताज्या बातम्या

Udaipur Intercity Express accident : मोठी दुर्घटना! आग लागल्याची अफवा पसरल्याने...

0
उदयपूर । Udaipur भय आणि घबराट माणसाकडून काय करून घेईल याचा नेम नसतो, पण कधीकधी हीच घबराट प्राणांतिक ठरते, याचाच एक अत्यंत दुर्दैवी प्रत्यय मध्य...