Saturday, May 9, 2026
Homeक्राईमNashik Crime News : ८० वर्षांच्या वृध्देवर अत्याचार

Nashik Crime News : ८० वर्षांच्या वृध्देवर अत्याचार

सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar

तालुक्यातील एका गावात (Village) शेतात (Farm) राहणाऱ्या ८० वर्षाच्या वृध्देवर लाईट दुरुस्तीसाठी आल्याचा बहाणा करत अज्ञात चोरट्याने अत्याचार (Rape) केल्याचा वा वृध्देच्या गळ्यातील ४ ग्रॅम सोन्याचा दागीना चोरून नेल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, ही वृध्दा शेतातील घरात झोपलेली असतांना ३०- ३५ वर्ष वयोगटातील अज्ञात तरुण घरात आला व घरातील लाईट गेली असून ती मी दुरुस्त करून देतो असा बहाणा करून घरात शिरला. वृध्दा एकटीच असल्याचे पाहून त्याने वृध्देवर बलात्कार केला व तिच्या गळ्यातील ४ ग्रॅमचा सोन्याचा दागीना (Gold Jewelry) घेऊन चोरटा फरार झाला.

दरम्यान, ही घटना परिसरात (Area) चर्चेचा विषय झाली असून, ज्या भागात वृद्ध व्यक्ती एकट्याच राहत असतील, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याची चर्चा सुरू होती. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे, उपनिरीक्षक सरोवर करीत आहेत.

ताज्या बातम्या

नाशिकमध्ये उष्णतेची तीव्रता पुन्हा वाढली; पाच दिवसांनंतर तापमानाचा पारा ४० अंशांपार

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेने शुक्रवारी (दि. ९) पुन्हा जोर धरला असून तब्बल पाच दिवसांनंतर कमाल तापमानाने ४०...