नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti-Narcotics Squad) सापळा रचून एका कारमधून ३० किलो गांजाचा (Ganja) साठा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) तपास करीत अल्पवयीन मुलास ताब्यात घेत मुंबई व धुळे जिल्ह्यातून चौघांना अटक (Arrested) केली आहे. बुधवारी (दि.२०) मध्यरात्री एकच्या सुमारास आडगाव शिवारात ही कारवाई केली. अटक केलेल्या चारही संशयितांना सोमवारपर्यंत (दि.२५) पोलीस कोठडी सुनावली आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : धाडसी नैना पगारियांचा प्रतिकार नडला; दरोडा टाकून पंजाबात पळालेल्या आंतरराज्य टोळीचा छडा, दोघे ताब्यात
अरबाज शकील खान मनियार (२६, रा. वाघाडी, शिरपूर,जि. धुळे), तौसिफ रहमत खान (५२, रा. गोवंडी पश्चिम), अमन शौकत शेख (२५, रा. चेंबुर, मुंबई) व विजय वाला पावरा (३५, रा. शिरपूर, जि. धुळे) अशी अटक केलेल्या संशयितांची (Suspected) नावे आहेत. शहर पोलिसांच्या ९९२३३२३३११ या व्हॉट्सअप क्रमांकावर आलेल्या तक्रारीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली. पथकाच्या प्रभारी निरीक्षक सुशीला कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मध्यरात्री महामार्गावरील आडगाव शिवारात सापळा रचला. एमएच ३९ जे ७३९१ क्रमांकाच्या कारची तपासणी केली असता त्यात संशयित अरबाज मनियारसह एक विधीसंघर्षित मुलगा आढळून आला.
कारच्या (Car) पाठीमागील बाजूला ३० किलो गांजाचा साठा आढळला. पोलिसांनी तपास करीत कारसह गांजाचा साठा असा एकूण १२ लाख १ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांच्या सखोल तपासात गुन्हे शाखेने दोन पथक तयार करीत इतर संशयितांची धरपकड केली. एका पथकाने मुंबईतील (Mumbai) गोवंडी परिसरातून दोघांना पकडले तर एका पथकाने धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथून एकास पकडले. संशयितांनी हा गांजाचा साठा विक्रीसाठी बेकायदेशीररीत्या बाळगल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे यांच्या फिर्यादीनुसार, आडगाव पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात एन. डी. पी. एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा : Nashik Trimbakeshwar News : त्र्यंबकनगरीत नियमांची होळी; उत्पादन शुल्क सुस्त, मंदिराच्या हाकेच्या अंतरावर मद्यालयांची चंगळ




