Wednesday, November 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजPune Crime News:"शहरातील ढासळलेली कायदा-सुव्यवस्था..." पुण्यातील घटनेवरुन सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल, म्हणाल्या,...

Pune Crime News:”शहरातील ढासळलेली कायदा-सुव्यवस्था…” पुण्यातील घटनेवरुन सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल, म्हणाल्या, भरदिवसा शस्त्रे…

पुणे | Pune
पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या परिसरात भरदिवसा झालेल्या गोळीबार आणि कोयत्याने हल्ल्याच्या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले आहे. न्यायालयासारख्या संवेदनशील परिसरातच नागरिक सुरक्षित नसतील, तर सामान्य जनतेने सुरक्षेसाठी कोणाकडे पाहायचे, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. या घटनेवरून त्यांनी पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीसह राज्याच्या गृहखात्यावरही तीव्र टीका केली.

पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाच्या परिसरातच आज (बुधवारी, ता २५) गोळीबाराची घटना घडली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार ७ आरोपींनी कोर्ट परिसरात एका व्यक्तीवर गोळीबार केला. ती व्यक्ती स्वत:चा बचाव करुन पळत असतानाच त्याच्यावरतीच कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. यात त्या पीडित व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. ही घटना 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पुणे शिवाजीनगर कोर्टाच्या बाहेर गेट नंबर 4 च्या परिसरात ही घटना घडली. टोळीयुद्धातून हा हल्ला घडला असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या घटनेच्यानिमित्ताने पुण्यातील (Pune news) कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती किती भीषण झाली आहे, हे पुन्हा एकदा दिसून आले.

- Advertisement -

खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थित करत शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर चिंता व्यक्त केली. न्यायालय परिसरात पोलीस चौकी आणि सुरक्षा व्यवस्था असतानाही हल्लेखोर शस्त्रांसह येऊन हल्ला करतात, यावरून गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक उरला आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला
पुण्यातील घटनेबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, “विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी आणि सुरक्षित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या पुण्याची ओळख आज गुन्हेगारीचे आणि दहशतीचे शहर अशी होत चालली आहे, ही अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी बाब आहे. पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात आज भरदिवसा एका व्यक्तीवर गोळीबार आणि कोयत्याने सपासप वार करण्यात आले. ही घटना पुणेकरांच्या आणि एकंदरीत शहराच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.”

पवित्र वास्तूच्या परिसरात जर भरदिवसा रक्ताचा सडा पडत असेल, तर…
“न्यायालय हे सर्वसामान्य माणसासाठी न्यायदानाचे मंदिर असते. जिथे प्रत्येक नागरिक न्यायाच्या आणि संरक्षणाच्या अपेक्षेने येतो, त्याच पवित्र वास्तूच्या परिसरात जर भरदिवसा रक्ताचा सडा पडत असेल, तर सर्वसामान्य पुणेकरांनी कोणाकडे पाहायचे?”, असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला आहे.

Pune Crime News : पुणे हादरले! कोर्टाबाहेर दिवसाढवळ्या गोळीबार; एकावर कोयत्याने हल्ला, रुग्णालयात उपचार सुरु

हल्लेखोरांची हिंमत होतेच कशी?
“विशेष म्हणजे, या परिसरात पोलीस चौकी आहे, सुरक्षा बंदोबस्त आहे आणि पोलिसांची सततची वर्दळ असते. तरीही भरदिवसा शस्त्रे घेऊन येण्याची आणि खून करण्याची हल्लेखोरांची हिंमत होतेच कशी? गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नाही, हेच यावरून स्पष्ट होते”, असा गंभीर आरोप सुळे यांनी केला आहे.

जनतेच्या जीवाची हमी कोण घेणार?
सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, “गेल्या काही काळापासून पुण्यात कोयता गँगची दहशत, गोळीबाराच्या घटना, भररस्त्यात होणारे खून आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था नावाची चीज पुण्यात शिल्लक उरली आहे की नाही, असा गंभीर प्रश्न आता प्रत्येक पुणेकर विचारत आहे.”

कायदा-सुव्यवस्थेचे अक्षरशः तीनतेरा वाजले
“पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे अक्षरशः तीनतेरा वाजले आहेत. जर न्यायालयासारख्या अतिसंवेदनशील ठिकाणीच नागरिक सुरक्षित नसतील, तर शहरातील इतर भागांत राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या जीवाची हमी कोण घेणार?”, असा प्रश्न त्यांनी केला आहे.

गृहखाते पूर्णपणे अपयशी ठरले
सुप्रिया सुळे यांनी पोलीस आणि गृह खात्याला या घटनेनंतर सवाल केला आहे. त्या म्हणाल्या की, “पोलीस प्रशासन नेमके काय करत आहे? गुन्हेगारांवर जरब बसवण्यात पुणे पोलीस आणि गृहखाते पूर्णपणे अपयशी ठरले आहे का?”

गृहखात्याने या घटनेचे गांभीर्य ओळखून
“केवळ आश्वासने देऊन किंवा कागदोपत्री कारवाया करून शहरातील गुन्हेगारी थांबणार नाही. पुणे पोलीस आयुक्तांनी आणि राज्याच्या गृहखात्याने या घटनेचे गांभीर्य ओळखून यातील सर्व गुन्हेगारांना तात्काळ अटक करावी आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. तसेच, शहरातील ढासळलेली कायदा-सुव्यवस्था तातडीने पूर्वपदावर आणण्यासाठी ठोस पावले उचलावीत, जेणेकरून सर्वसामान्य पुणेकरांना पुन्हा एकदा निर्भयपणे जगता येईल”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : अमरधाम विसाव्याजवळ तरुणावर हल्ला; लोंढे टोळीच्या...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik सातपूर परिसरातील (Satpur Area) स्वारबाबा नगर येथील अमरधाम विसावा परिसरात तरुणावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या (Attack) घटनेला आता वेगळे वळण मिळाले...