Sunday, August 23, 2026
Homeक्राईमNashik Crime News: टेम्पोतून ऑईलची गळती झाल्याने पोलिसांचा संशय बळावला, अन् लाखो...

Nashik Crime News: टेम्पोतून ऑईलची गळती झाल्याने पोलिसांचा संशय बळावला, अन् लाखो रुपयांच्या केबल चोरीचा उलगडा झाला

नाशिक | प्रतिनिधी
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कंपनीची भूमिगत केबल चोरी करणाऱ्या टोळीचा नाशिकरोड पोलिसांनी पर्दाफाश केला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेली केबल, गुन्ह्यात वापरण्यात आलेला जेसीबी व मालवाहू टेम्पोसह तब्बल एक कोटी ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी सांगितले की, ३० मे रोजी रात्री ८ ते ३१ मे रोजी सकाळी १० वाजेदरम्यान बिटको चौकातील मेडिकलसमोरील बीएसएनएलच्या सिमेंट चेंबरमधून भूमिगत केबल चोरी करण्यात आली होती. अज्ञात चोरट्यांनी सिमेंट चेंबर उघडून त्यामधील सुमारे ३५ लाख रुपये किमतीची महागडी ‘यू.जी. केबल’ यंत्राच्या सहाय्याने ओढून कापून नेली होती. याप्रकरणी बीएसएनएलचे अधिकारी बाळासाहेब दत्तात्रय कोटकर यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

- Advertisement -

त्यानुसार १ जून रोजी रात्री सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी व त्यांचे गुन्हे शोधपथक बिटको चौक ते लॅमरोड परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी एक संशयास्पद मालवाहू टेम्पो पोलिसांची गाडी पाहून भरधाव पळू लागला. पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून टेम्पोला अडविले. टेम्पोची तपासणी करताना त्याच्या मागील भागातून ऑइल गळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. केबल कापताना बाहेर पडलेल्या ऑईलच्या खुणांमुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये बीएसएनएल केबलचे लहान-मोठे तुकडे आढळून आले. पुढील तपासात केबल चोरीसाठी चक्क जेसीबीचा वापर करण्यात आल्याचे उघड झाले.

Raj Thackeray: “…तर तुमचं आयुष्य किड्या-मुंग्यांसारखं होईल हे नक्की”; राज ठाकरेंचं पर्यावरणावर सविस्तर भाष्य, म्हणाले…

चार आरोपी अटकेत
या प्रकरणी पोलिसांनी वहाब अब्दुल नवाज (३५, भांडूप, मुंबई), सुरेश दिलीप वैराळ (३७, भांडूप, मुंबई), बसंतलाल राजाराम यादव (३८, चेंबूर, मुंबई) आणि कमलेशकुमार सुखदेव रविदास (२६, बिहार, जेसीबीचालक) यांना अटक केली आहे. न्यायालयाने चारही आरोर्पीना पोलीस कोठडी सुनावली असून त्यांनी राज्यातील इतर ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास सुरू आहे.

पोलिसांच्या पथकाची कामगिरी
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे आणि सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) अतुल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, हवालदार विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव तसेच पोलीस शिपाई अरुण गाडेकर, रोहित शिंदे आणि योगेश रानडे यांनी विशेष भूमिका बजावली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राहुल गांधी यांच्याकडून राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरू

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar कॉक्रोज जनता पक्षाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छात्रो की गुंज असे उपक्रम हाती घेऊन राहुल गांधी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम करत आहेत....