Monday, October 19, 2026
Homeक्राईमNashik Crime News : "मी परिसराचा भाई आहे, एकेकाचा मुडदा..."; दूध व्यावसायिकासह...

Nashik Crime News : “मी परिसराचा भाई आहे, एकेकाचा मुडदा…”; दूध व्यावसायिकासह मित्रावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

घराजवळ (House) संशयास्पदरीत्या थांबल्याचे विचारल्याच्या कारणातून स्थानिक गुंडांनी एका ३५ वर्षीय दूध व्यावसायिकावर व त्याच्या मित्रावर दांडके आणि फळीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, मी या परिसराचा भाई आहे, एकेकाचा मुडदा पाडतो, अशी धमकी देऊन धारदार शस्त्र हवेत फिरवून परिसरात दहशत माजवली. या हल्ल्यामुळे (Attack) भयभीत नागरिकांनी तातडीने घरांचे दरवाजे बंद करून घेतले. शनिवार (दि. १७) मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास पंचवटीतील नागचौक, जोशीवाडा भागात हा प्रकार घडला.

- Advertisement -

याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvathi Police Station) मुख्य संशयित किशोर वाकाेडेसह चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सागर अशोक गरड (वय ३५, रा. जोशीवाडा, नागचौक) यांच्या फिर्यादीनुसार ते दूध व्यावसायिक असून मध्यरात्रीच्या सुमारास घराकडे परतत होते. त्यावेळी त्यांच्या घराजवळ एक संशयित संशयास्पदरीत्या उभा असल्याचे पाहून त्यांनी, तू एवढ्या रात्री इथे काय करतोस? अशी विचारणा केली. ​यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला असता, शेजारच्या बोळीतून आणखी एक संशयित तिथे आला आणि त्याने सागर यांना नागचौकात नेले. दरम्यान, तिथे सागर यांचा मित्र विकी यशवंत बर्गे हा देखील आला. याच वादातून संशयितांनी इतर साथीदारांना फोन करून बोलावून घेतले.

किशोर वाकोडे व त्याच्या इतर तीन साथीदारांनी (Suspected) सागर गरड आणि विकी बर्गे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, लाकडी दांडक्याने व फळीने बेदम मारहाण केली. यादरम्यान परिसरातील नागरिक मदतीसाठी पुढे येत असल्याचे पाहून किशोर वाकोडे याने, मला ओळखले नाही का, मी या परिसराचा भाई आहे, एकेकाचा मुडदा पाडतो, असे म्हणूण दहशत माजविली. ​तसेच धारदार हत्यार काढून ते हवेत फिरवले. लोकांच्या अंगावर हत्यार उगारून पाठलाग केल्याने वस्तीत एकच पळापळ झाली आणि नागरिकांनी घरांचे दरवाजे बंद करून घेतले. जाताना हल्लेखोरांनी, पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर तुमच्याकडे पाहताे, अशी धमकी देत पळ काढला.

​पोलिसांची कारवाई सुरू

​या प्रकरणी सागर गरड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, तपास पोलीस हवालदार अमोल पाटील करत आहेत. मध्यरात्री घडलेल्या या प्रकारामुळे नागचौक आणि जोशीवाडा परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला हाेता. स्थानिक गुंडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला 225 रुपयांपर्यंत प्रतिकिलोला भाव मिळाला. सोमवारी डाळिंबाच्या (Pomegranate) 2328 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब...