Sunday, November 22, 2026
HomeनाशिकNashik Crime News : न्यायालयात गेल्यास 'शेवटची तारीख' ठरवण्याची धमकी दिली अन्...

Nashik Crime News : न्यायालयात गेल्यास ‘शेवटची तारीख’ ठरवण्याची धमकी दिली अन् RTO अधिकाऱ्याने टोकाचं पाऊल उचललं; मुलासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मुला-मुलींना लहानाचे मोठे केले, त्यांच्याच असह्य शारीरिक, मानसिक व आर्थिक छळाला आणि मालमत्तेच्या वादातून दिल्या जाणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्यांना कंटाळून आरटीओच्या एका सेवानिवृत्त अधिकारी पित्याने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून जीवनयात्रा संपविल्याचे पाेलिसांच्या तपासात व फिर्यादीनुसार समाेर आले आहे. ‘न्यायालयात (Court) सुनावणीसाठी हजर राहिल्यास तीच तुझी शेवटची तारीख असेल,’ अशा शब्दांत मुलाने आणि नातेवाईकांनी कोंडी केल्यामुळे या हतबल पित्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

- Advertisement -

याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) मृत व्यक्तीच्या दुसऱ्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून मुलगा, सून, मुलगी आणि मुलाच्या सासऱ्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उंटवाडी रोडवरील संभाजी चौक येथील उषाकिरण सोसायटीत राहणारे व सेवानिवृत्त सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंत गाेविंद हेमाडे यांनी गुरुवारी (दि. १९) पहाटे स्वतःच्या डाेक्यात गोळी झाडून आत्महत्या केली हाेती. याप्रकरणी त्यांच्या पत्नी योगीता हेमंत हेमाडे (वय ५२, रा. उषा किरण सोसायटी, संभाजी चौक) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या तक्रारीवरून पोलिसांनी मृत हेमंत हेमाडे यांचा मुलगा संशयित यश हेमंत हेमाडे (वय ३०, रा. नेचरर्स ब्लिझ बिल्डिंग, कटारीया ब्रिजजवळ, नाशिक), सून भाग्यश्री यश हेमाडे (वय २८, रा. उषा किरण सोसायटी, संभाजी चौक), मुलगी प्रियंका कुणाल खोपकर (वय ३२, रा. भक्ती पार्क, वडाळा ईस्ट, मुंबई) आणि यशचे सासरे मल्लिकार्जुन उमदी (वय ५८, रा. एकांत, आसाराम बापू ब्रिजजवळ, नाशिक) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिरराव करत असून, अद्याप कोणालाही अटक (Arrested) करण्यात आलेली नाही.  

​पुनर्विवाह आणि मालमत्तेचा वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छळाचा हा प्रकार ८ ऑक्टोबर २०२१ पासून २० नोव्हेंबर २०२६ पर्यंत सुरू होता. मृत हेमंत हेमाडे यांनी फिर्यादी योगीता यांच्याशी पुनर्विवाह केला होता. हा पुनर्विवाह तसेच कुटुंबीयांच्या मालमत्तेवरील योगीता यांचे सर्व हक्क सोडून देण्यासाठी मुलामुलीने व सूनेने हेमंत हेमाडे यांच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर, हेमंत यांची फसवणूक (Fraud) करून त्यांची मिळकत बळकावली होती.  

​न्यायालयात जाण्याचे मार्ग रोखले

बळकावलेली मालमत्ता परत मिळवण्यासाठी हेमंत हेमाडे यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. हा दावा आणि इतर न्यायालयीन प्रकरणे मागे घेण्यासाठी चौघा संशयितांनी त्यांना वेळोवेळी धमकावले आणि त्यांचा शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ केला. यापुढे न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहिल्यास पती-पत्नी दोघांसाठी ती शेवटची तारीख असेल,’ अशी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या धमक्यांमुळे आपले हक्क आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी न्यायालयाचे दरवाजेही बंद झाल्याची भावना हेमंत हेमाडे यांच्या मनात निर्माण झाली. सर्व बाजूंनी कोंडी झाल्याने आणि आत्महत्येशिवाय कोणताही पर्याय न उरल्याने त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समाेर आले आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : पाचशे काेटींत पोलिसांचे स्मार्ट नियोजन; ​सिंहस्थासाठी अकराशे कोटींची...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik ​आगामी २०२६-२७ च्या सिंहस्थासाठी (Simhastha) शहर पोलीस आयुक्तालयाने १ हजार १०० कोटी रुपयांच्या निधीची अपेक्षा व्यक्त केली असताना, शासनाने नुकत्याच...