Tuesday, November 24, 2026
HomeनाशिकNashik Crime News : ​परवानगी विचारल्याने जीवघेणा हल्ला; स्पीड ब्रेकरबाबत चौकशी केल्याने...

Nashik Crime News : ​परवानगी विचारल्याने जीवघेणा हल्ला; स्पीड ब्रेकरबाबत चौकशी केल्याने मजुरांची नागरिकाला बेदम मारहाण

म्हसरूळ पोलिसांत गुन्हा

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिकेच्या वतीने शहरात टाकण्यात येणाऱ्या प्लास्टिक स्पीड हम्पच्या परवानगीबाबत (स्पीड ब्रेकर) विचारणा करणाऱ्या एका नागरिकाच्या (Citizen) घरात शिरुन कंत्राटदाराच्या मजुरांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण (Beating) केल्याची घटना म्हसरूळ परिसरात घडली आहे. स्पीड ब्रेकर टाकण्याची परवानगी आहे का? असा जाब विचारल्याच्या रागातून हा प्रकार घडला असून, म्हसरूळ पोलीस ठाण्यात (Mhasrul Police Station) दोन मजुरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

​पाेलिसांच्या (Police) माहितीनुसार म्हसरूळ येथील हुतात्मा अनंत कान्हेरे नगरातील रहिवासी चिन्मय रवींद्र भागवत (वय ४०) हे शनिवारी(दि. ३) सायंकाळी ७:०० वाजेच्या सुमारास घरात हाेते. त्यांच्या फिर्यादीनुसार, घरासमाेरील रस्त्यावर स्पीड ब्रेकर टाकण्याचे काम सुरू होते. भागवत यांनी काम करणाऱ्या मजुरांना स्पीड ब्रेकर टाकण्याच्या परवानगीबाबत चौकशी केली. याचा राग आल्याने दोन अनोळखी मजुरांनी भागवत यांच्या घरात घुसून त्यांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने डोक्याच्या मागील बाजूस व डाव्या पायाच्या गुडघ्यावर गंभीर मारहाण केली आणि तेथून पळ काढला.

उपनिरीक्षक क्षीरसागर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. विशेष म्हणजे शहरात जागाेजागी हे स्पीड हम्प टाकून दोन महिनेही उलटत नाहीत तोच ते निखळून पडत असल्याने या कामांच्या दर्जाहिनतेची पोलखोल झाली आहे. आधीच या त्रासाला वैतागलेल्या नाशिककरांना (Nashik) आता कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांकडून मारहाणीचा सामना करावा लागत असल्याने याविरोधात संताप व्यक्त होत आहे.

​नियम धाब्यावर अन् दर्जाहीन कामे

​नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्लास्टिक स्पीड ब्रेकर्स, गतिरोधक व रंबलर्स बसवण्यासाठी नगरविकास व परिवहन विभागाचे विशिष्ट निकष आणि नियम आखून देण्यात आले आहेत. मात्र, हे सर्व नियम व निकष धाब्यावर बसवून मनपा प्रशासन आणि कंत्राटदारांकडून शहरात जिथे-तिथे अनावश्यक ठिकाणी प्लास्टिक स्पीड हम्प टाकले जात असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. ​केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी नाशिककरांच्या कररूपी पैशांची महापालिकेच्या तिजोरीतून उधळपट्टी सुरू आहे.

ताज्या बातम्या

Crime News : डॉक्टरांचे क्लिनिक फोडून ऐवज लांबविला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरातील बाळासाहेब देशपांडे रूग्णालयासमोरील मदनचंद्र आर्केड इमारतीतील डॉ. अविनाश किनगांवकर यांच्या आय क्लिनिकमध्ये घरफोडी करून चोरट्याने सुमारे 22 हजार 900 रूपयांचा ऐवज...