Monday, October 19, 2026
Homeक्राईमNashik Crime News : बारा लाखांचे सिगारेट लंपास; सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा...

Nashik Crime News : बारा लाखांचे सिगारेट लंपास; सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

रविवार कारंजा परिसरातील फावडे लेन येथील एका गोडावूनचे कुलूप तोडून अज्ञातांनी तब्बल ११ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या सिगारेट लांबवल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून, या चोरीमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

सुराणा कॉम्पलेक्समध्ये (Surana Complax) राहणारे व्यापारी आदेश अशोक कुमट (वय ४३) यांचे रविवार कारंजावरील फावडे लेन परिसरात गोडावून आहे. शुक्रवारी (ता.१६) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी गोडावूनचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि सिगारेटने भरलेले एकूण ८ बॉक्स चोरून नेले.

सकाळी गोडावून उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा (Case) दाखल केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फूटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरु आहे.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : भरधाव टँकरने चिरडल्याने महिला ठार; मुलगा, नातू...

0
मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon शहरातील राष्ट्रीय एकात्मता चौक रस्त्यावरून भरधाव वेगात जात असलेल्या डिझेल टँकरने पुढे जात असलेल्या दुचाकीस धडक देत फरफटत नेले या...