Tuesday, June 9, 2026
Homeक्राईमNashik Crime News : ​डिजिटल बंड की अंतर्गत वाद? किन्नर शिष्याच्या मारहाण...

Nashik Crime News : ​डिजिटल बंड की अंतर्गत वाद? किन्नर शिष्याच्या मारहाण प्रकरणाला दुहेरी पदर, गुन्हा नाेंद

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

इन्स्टाग्रामवर विराेधातील व्हिडिओ टाकल्याच्या वादातून एका किन्नर (Transgender) गुरूने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने शिष्याला बेदम मारहाण केल्याची आणि २५ हजार रुपये हिसकावून घेतल्याची फिर्याद भद्रकाली पाेलिसांत दाखल झाली आहे. या प्रकरणी पीडित शिष्याच्या तक्रारीवरून तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गणेशवाडीत काही दिवसांपूर्वी घडलेले एका किन्नरला मारहाणीचे प्रकरण वेगळे असून अद्याप त्याबाबत पाेलिसांत नाेंद नाही.

- Advertisement -

 फिर्यादी सोनिया उर्फ यश दत्तु बकुरे (वय २१, रा. आडगाव) ही गेल्या ७ वर्षांपासून सलमा उर्फ सलीम गुरु नायक या किन्नर गुरूच्या अधिपत्याखाली भिक्षुकीचे काम करते. ११ मे २०२६ रोजी सोनियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘सलमा गुरू त्रास देत आहेत’ अशा आशयाचा एक व्हिडिओ अपलोड केला होता. तक्रारीनुसार, या व्हिडिओचा राग मनात धरून सलमा गुरूने सोनियाला फोन करून दुसऱ्या दिवशी, १२ मे २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजता झाकिर हुसेन हॉस्पिटल जवळील ‘हिजडा कब्रस्थान’ येथे भेटायला बोलावले. सोनिया तिथे पोहोचली असता, तिथे आधीच हजर असलेल्या संशयित सलमा गुरू, सोनाली उर्फ रोहन बलक आणि सारिका उर्फ सुनील राठोड यांनी “तू व्हिडिओ का टाकलास?” असा जाब विचारला.

त्यानंतर दोघांनी सोनियाला पकडून ठेवले आणि तिघांनी मिळून तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, या मारहाणीदरम्यान सलमाच्या कमरेला कोयता लावलेला होता. त्याने सोनियाकडील २५,००० रुपयांची रोकड जबरीने हिसकावून घेतली आणि पुन्हा व्हिडिओ व्हायरल केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे.

तक्रारीस विलंब आणि कारवाई

​या प्रकारामुळे घाबरलेल्या सोनियाने सुरुवातीला कोणालाही काही सांगितले नाही. मात्र, ७ जून २०२६ रोजी तिने हा प्रकार तिच्या इतर किन्नर मैत्रिणींना सांगितला. सोनियाने भद्रकाली पोलिल ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली. भद्रकाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून उपनिरीक्षक प्रतापसिंह दहीफळे पुढील तपास करत आहेत. 

कोणते कलम लावण्यात आले?

कलम ११५(२): स्वेच्छेने दुखापत करणे

​कलम ३(५): सामूहिक गुन्हेगारी कृत्य

​कलम ३०९(४): बळजबरीने चोरी/लूट

​कलम ३५२: शांतता भंग करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक अपमान करणे

​कलम ३५१(२) आणि ३५१(३): गुन्हेगारी धमकी देणे

ताज्या बातम्या

प्रत्येक जिल्ह्यात सीईटीसेलचे विद्यार्थी सहाय्यता केंद्र सुरु होणार – मंत्री चंद्रकांत...

0
मुंबई | प्रतिनिधी MUMBAI राज्यातील विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (कॅप), शिष्यवृत्ती योजना आणि प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अचूक माहिती त्यांच्या जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे यासाठी राज्यातील...