Monday, October 26, 2026
Homeक्राईमNashik Crime News : चाकूचा धाक दाखवत मुलाचे शोषण; सराईतावर पाेक्साेअंंतर्गत गुन्हा

Nashik Crime News : चाकूचा धाक दाखवत मुलाचे शोषण; सराईतावर पाेक्साेअंंतर्गत गुन्हा

भावावरही गुन्ह्यांची नाेंद

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सातपूर परिसरातील (Satpur Area) संताेषी माता मंदिराच्या परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलास जवळ बालावून त्याच्या गळ्यात हात टाकत चाकूचा धाक दाखवून अश्लिल कृत्य व धमकावल्याची घटना समाेर आली आहे. या प्रकरणी सातपूर पाेलीस ठाण्यात (Satpur Police Station) पाेक्साेसह भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताचा भाऊ देखील पाेलीस दप्तरी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, संशयिताने विकृती आणि परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचे तपासात समाेर येत आहे.

- Advertisement -

​सागर तुकाराम शिंगाडे (वय २५, रा. संतोषी मंदिराजवळ, सातपूर, नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी (दि. २९) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. फिर्यादीचा १४ वर्षांचा मुलगा घरासमोर मित्रांसोबत उभा होता. त्यादरम्यान संशयित सागर शिंगाडे याने त्याला जबरदस्तीने जवळ बोलावून घेतले. मुलाच्या गळ्यात हात टाकून, खिशातून चाकू काढून त्याचा धाक दाखवत मला तू खूप आवडतो, मला पप्पी दे, अशी अश्लिल मागणी केली व भीतीचे वातावरण निर्माण केले.

दरम्यान, मुलाने घाबरून आरडाओरड केल्याने संशयिताने (Suspected) काढता पाय घेतला. मात्र, काही वेळाने तो मुलगा घरासमोर उभा असताना संशयिताने पुन्हा त्याच्याजवळ येण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा करत आहेत.

​रेकॉर्डवरील पार्श्वभूमी आणि विकृती

पोलीस तपासादरम्यान समाेर आलेल्या माहितीनुसार, संशयित सागरचा भाऊ करण हा पोलीस दप्तरी गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी असलेला संशयित आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि परिसरात असलेला धाक याचा फायदा घेत संशयित सागरने विकृत मानसिकतेतून अल्पवयीन मुलाला लक्ष्य केल्याचा संशय आहे. संशयित सागर याच्यावरही यापूर्वी सातपूर पोलीस ठाण्यात भादंवि सदाेष मनुष्यवधासह मारहाणीचा गुन्हा दाखल आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : यंदा टंचाई आराखड्यात माणसांसह जनावरांच्या पाण्याचा ताळेबंद

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यात आतापासून निर्णय झालेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्यावतीने टंचाई कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. हा आराखडा...