Wednesday, October 7, 2026
Homeक्राईमNashik Crime News : विद्यार्थ्यांना अडवून मारहाण करणारे जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-२...

Nashik Crime News : विद्यार्थ्यांना अडवून मारहाण करणारे जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-२ ची २४ तासांत कामगिरी

नवीन नाशिक | New Nashik

पहाटे रिक्षाने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा (Student) पाठलाग करून कार आडवी लावत मारहाण व शिवीगाळ करत रोकड आणि ऑनलाइन पैसे बळजबरीने घेणाऱ्या संशयिताला नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ ने अवघ्या २४ तासांत मुंबईतील (Mumbai) चेंबूर येथून अटक केली. प्रबल संतोष नाडे (२४, रा. नागसेनवाडी, वडाळानाका, नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. या घटनेनंतर विद्याथ्यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखा युनिट २ चे अधिकारी व अंमलदार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात झाली.

- Advertisement -

आरोपींच्या वाहनाचा माग काढताना पोलिसांना (Police) महत्त्वाचा धागा मिळाला. तपास सुरू असताना पोलीस हवालदार अतुल पाटील आणि पोलीस हवालदार बाल्मिक चव्हाण यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. नागसेनवाडी, वडाळानाका परिसरात राहणारा प्रबल संतोष नाडे (२४) याचा या गुन्ह्यात सहभाग असून, तो गुन्ह्यानंतर मुंबईतील चेंबूर परिसरात असल्याची माहिती मिळाली. ही माहिती गुन्हे शाखा युनिट रचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने पथक तयार करून वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीने व मार्गदर्शनाखाली मुंबईकडे रवाना केले. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत मोहिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार अतुल पाटील, पोलीस हवालदार वाल्मिक चव्हाण, पोलीस अंमलदार मनोज शिंदे आणि पोलीस अंमलदार सुनील खैरनार यांचा समावेश होता. पथकाने मुंबई गाठल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयितांचा शोध सुरू केला.

दरम्यान, सायन-ट्रॉम्बे रोड, डोमिनोज पिझ्झाजवळ, चेंबूर येथे संशयित त्याच्या इटिंगा वाहनासह येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी परिसरात सापळा रचला. काही वेळातच संशयित (Suspected) इटिंगा बाहनासह तेथे आला आणि पोलिसांच्या पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता नाडे याने हा गुन्हा त्याच्या साथीदार विधी संघर्षीत बालकाच्या मदतीने केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी प्रबल नाडे याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली (एमएच ४७ बी बाय ७५६२ इर्टिगा कार आणि मोबाइल असा एकूण ६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयित नाडे व जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी भद्रकाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट; दुष्काळाच्या...

0
नवी दिल्ली | New Delhi राज्यात पाऊस (Rain) आधीच माघारी परतल्याने महाराष्ट्रात दुष्काळी (Maharashtra Drought) परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारकडून सुरुवातील २६५ आणि नंतर...