नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक शहरात (Nashik City) गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाईन गुंतवणुकीच्या (Online Fraud) नावाखाली फसवणुकीचे सत्र सुरूच आहे. नोव्हेंबर २०२५ पासून सुरू असलेल्या फॉरेक्स ट्रेडिंगमधील फसवणुकीच्या जाळ्यात नाशिकचे चार प्रतिष्ठित व्यावसायिक अडकले आहेत. जादा नफ्याचे आमिष दाखवून सायबर चोरांनी त्यांना १ कोटी ६२ लाखांहून अधिक रकमेला लुटले आहे. या गुन्ह्याची व्याप्ती पाहता, सायबर चोरट्यांचे जाळे आता झारखंडच्या ‘जामतारा’ पलीकडे जाऊन राजस्थान आणि उत्तर भारतात विस्तारल्याचे स्पष्ट होत आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : ‘डिजिटल पाठलाग’ उघड; रझा, शफिकच्या मोबाईलमधील चॅटिंग अन् सोशल मीडिया रडारवर
दाखल तक्रारासह फिर्यादींनुसार अन्य तिघा व्यावसायिकांना सुश्मिता शर्मा आणि अनिश मॅथ्यू नावाच्या व्यक्तींनी सोशल मीडिया (Social Media) आणि व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधला. क्रिप्टो आणि फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीत प्रचंड परतावा मिळेल, असे आमिष त्यांना दाखविल. सुरुवातीला काही किरकोळ नफा झाल्याचे आभासी (व्हर्चुअल) रितीने दाखवून या व्यावसायिकांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, वेगवेगळ्या बँक खात्यांवर टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम भरण्यास भाग पाडले.
हे देखील वाचा : Nashik Crime News : कोयत्याने सपासप वार करत युवकाचा खून; दोघे संशयित ताब्यात
जेव्हा व्यावसायिकांनी आपला नफा आणि मुद्दल काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना अधिक ‘टॅक्स’ भरण्यास सांगण्यात आले आणि शेवटी संपर्क नंबर बंद केले. नाशिक शहर सायबर पोलिसांनी या प्रकरणी सुश्मिता शर्मा आणि अनिश मॅथ्यू यांच्यासह त्यांच्या अज्ञात साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. त्याअन्वये भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे अधिक तपास करत आहेत.
हे देखील वाचा : Nashik Suicide News : बावीस वर्षीय तरुणाची राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या
जामतारा ते राजस्थान
पूर्वी सायबर गुन्ह्यांसाठी झारखंडमधील जामतारा कुप्रसिद्ध होते. मात्र, आता हे लोण दिल्ली, नोएडा आणि विशेषतः राजस्थानच्या मेवाड व भरतपूर भागात पसरले आहे. तपासातील प्राथमिक माहितीनुसार, या गुन्ह्यातील पैशांचे व्यवहार ज्या बँक खात्यांवर झाले आहेत, त्यांची लिंक राजस्थानशी जोडलेली असल्याचे दिसत आहे. राजस्थानमधील काही टोळ्या सध्या सुशिक्षित तरुणांना हाताशी धरून अशा प्रकारचे फिशिंग आणि ट्रेडिंग स्कैम करते असल्याचे समोर येत आहे.
हे देखील वाचा : Nashik Trimbakeshwar Crime : त्र्यंबकेश्वरचा ‘व्हीआयपी’ बाजार; कडलगांच्या खात्यात तेरा लाखांची माया
नागरिकांनो सावधान !
फॉरेक्स ट्रेडिंग किंवा क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ती संस्था अधिकृत आहे का, याची पडताळणी करणे आवश्यक आहे. अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नका किंवा कोणत्याही ‘व्हॉट्सअॅप ट्रेडिंग ग्रुप’च्या सल्ल्याने पैसे गुंतवू नका. जर फसवणूक झाली असेल, तर त्वरित १९३० या क्रमांकावर किंवा www. cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.





