Sunday, September 6, 2026
Homeक्राईमNashik Crime News : पेठ रोडवरील मॅनहोलमध्ये आढळला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह;...

Nashik Crime News : पेठ रोडवरील मॅनहोलमध्ये आढळला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह; म्हसरूळ पोलिसांकडून तपास सुरू

पंचवटी | वार्ताहर | Panchvati

- Advertisement -

पेठ रोडवरील (Peth Road) पिंगळे फार्म आणि सप्तरंग सोसायटी परिसरातील एका मॅनहोलमध्ये आज (रविवारी) सकाळी अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह (Dead Body) आढळून आला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

याबाबत अधिक माहिती अशी की, मॅनहोलमध्ये मृतदेह (Manhole) आढळल्याची माहिती मिळताच म्हसरूळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी मॅनहोलमधून मृतदेह बाहेर काढत पुढील कार्यवाहीसाठी शासकीय रुग्णालयात (Civil Hospital) शवविच्छेदनासाठी पाठविला. मृतदेह मोठ्या प्रमाणावर कुजलेल्या अवस्थेत असून चेहराही विद्रूप झाल्याने मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात अडचणी येत आहेत.

दरम्यान, सदर व्यक्ती मॅनहोलमध्ये नेमकी कशी पडली, त्याचा मृत्यू कशामुळे झाला, तसेच ही घटना अपघाती आहे की अन्य काही कारणामुळे घडली याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात (Mhasrul Police Station) नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी अहिरे करीत आहेत.

ताज्या बातम्या

राज-का-रण : पप्पू पास हो गया..

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत'- संपादक काँग्रेस पक्षाने आपल्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करण्यास सुरुवात केली, याचे एक उत्तम आणि आश्वासक उदाहरण नुकतेच नाशिकमध्ये...