Wednesday, July 15, 2026
Homeक्राईमShalarth ID Scam : पासष्ट शाळांचे बोगस जाळे; धुळे जिल्हा रिपाइं शिक्षक...

Shalarth ID Scam : पासष्ट शाळांचे बोगस जाळे; धुळे जिल्हा रिपाइं शिक्षक आघाडीचा अध्यक्ष गजाआड

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शिक्षण विभागाला आणि शासकीय तिजोरीला कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या बहुचर्चित ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्या प्रकरणात (Shalarth ID Scam Case) नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेने (Crime Branch) मोठी कारवाई केली आहे. या घोटाळ्यातील मुख्य दलाल आणि संशयित संस्थाचालक प्रशांत तुलशीराम वाडिले याला शनिवारी (ता. ११) पहाटे धुळ्यातून नाट्यमयरीत्या अटक करण्यात आली. वाडिले हा धुळे जिल्हा रिपाइं (आठवले गट) शिक्षक आघाडीचा जिल्हाध्यक्ष असल्याने या घोटाळ्याला आता राजकीय परिमाणही लाभले आहे.

- Advertisement -

​या प्रकरणात आतापर्यंत झालेली ही चौथी अटक असून, या कारवाईमुळे बनावट शिक्षकांच्या भरतीचे (Teacher Recruitmet) आणि शालार्थ आयडी मंजुरीचे उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ​संशयित प्रशांत वाडिले याच्या नावावर कागदोपत्री ६५ पेक्षा अधिक आश्रमशाळा आणि शाळा असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, प्राथमिक तपासानुसार प्रत्यक्षात साक्री आणि शिंदखेडा भागात केवळ दोनच संस्था अस्तित्वात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. वाडिले याने बनावट शिक्षण संस्थांची कागदपत्रे तयार केली. त्याआधारे शेकडो शिक्षकांना बनावट नियुक्ती आदेश आणि शिक्षण विभागाचे बनावट मान्यता प्रमाणपत्र मिळवून दिले. या बोगस कागदपत्रांच्या आधारे ‘शालार्थ आयडी’ जनरेट करून शासनाकडून कोट्यवधी रुपयांचे वेतन लाटल्याचा संशय आहे.

​मध्यरात्री धुळ्यात सापळा, पहाटे बेड्या

​संशयित वाडिले हा धुळ्यात (Dhule) लपून बसल्याची माहिती नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार विशेष तपास पथकाचे प्रमुख व सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके, उपनिरीक्षक मोतीलाल पाटील आणि त्यांच्या पथकाने शुक्रवारी (दि.१०) रात्री धुळ्यात धाड टाकली. मध्यरात्री रचलेल्या या सापळ्यात अखेर शनिवारी पहाटे वाडिले पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याला धुळे न्यायालयात (Court) हजर करून ‘ट्रांझिट रिमांड’ घेण्यात आला असून, रविवारी (दि.१२) त्याला नाशिकरोड न्यायालयासमोर (Nashik Road Court) हजर केले जाणार आहे.

मुद्दे

मार्च २०२६ मध्ये नाशिकरोड पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल
गांभीर्य ओळखून पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी एसआयटी नेमली
आतापर्यंत ११,००० पानांचे प्राथमिक दोषारोपपत्र न्यायालयात सादर
या घोटाळ्यात आतापर्यंत १७ संशयित निष्पन्न
​वाडिलेच्या अटकेमुळे हा आकडा आणि आर्थिक व्याप्ती वाढणार

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कृषी विद्यापीठातील पद भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 2025 मध्ये करण्यात आलेली पद भरती प्रक्रिया वेगात पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील...