Friday, July 24, 2026
Homeक्राईमAshok Kharat Case : भोंदूगिरीतून ३७ कोटींची मनी लाँडरिंग; कॅप्टन खरातची ३६...

Ashok Kharat Case : भोंदूगिरीतून ३७ कोटींची मनी लाँडरिंग; कॅप्टन खरातची ३६ कोटींची मालमत्ता जप्त

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

स्वतःला भगवान शिवाचा अवतार सांगून भाविकांना कोट्यवधी रुपयांना लुटणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) उर्फ कॅप्टनची तब्बल ३६ कोटी ९० लाख रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. अंधश्रद्धेच्या बाजारातून गोळा केलेला हा काळा पैसा सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून पांढरा (मनी लाँडरिंग) केल्याप्रकरणी ईडीच्या मुंबई झोनल ऑफिसने बाबा, त्याची पत्नी कल्पना खरात (Kalpana Kharat) यांच्यासह सहा जणांविरोधात विशेष न्यायालयात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

भोंदू बाबा अशोककुमार एकनाथ खरात याने आजार बरे करणे, संकट निवारण आणि व्यवसायात भरभराटीचे आमिष दाखवून अवतार पूजाच्या ना-वाखाली भाविकांची फसवणूक (Fraud) केली होती. या गुन्हेगारीतून मिळालेला पैसा त्याने नाशिक, अहमदनगर, सोलापूर, पुणे आणि मुंबई येथे नातेवाईकांच्या नावावर स्थावर मालमत्तेत गुंतवला होता, असे इडीच्या तपासात समोर आले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

  • शिवाचा अवतार असल्याचा दावा : अशोक खरात स्वतःकडे दैवी शक्ती असून आपण भगवान शिवाचा अवतार असल्याचा खोटा दावा करून भाविकांना फसवायचा.
  • अवतार पूजा आणि आजार बरे करण्याचे आमिष : आजार बरे करणे, संकटे निवारण करणे, व्यवसायात भरभराट आणणे आणि अवतार पूजा करण्याच्या बहाण्याने तो लोकांकडून कोट्यवधी रुपये उकळायचा.
  • अनेक पोलीस ठाण्यांत गुन्हे : या भोंदू बाबाविरोधात नाशिकचे सरकारवाडा, शिर्डी, सिन्नर आणि राहता पोलीस ठाण्यात फसवणूक, खंडणी आणि धमकावल्याचे गुन्हे दाखल आहेत.
  • ३६.९० कोटींची मोठी कारवाई : ईडीने १५ जुलै रोजी १९.२० कोटींची स्थावर मालमत्ता जप्त केली, तर यापूर्वी एप्रिल-मे महिन्यात १७.७० कोटींचे बँक लॉकर्स, वाहने व इतर मालमत्ता गोठवली होती.
  • पतसंस्थांमध्ये काळा पैसा : जप्त केलेला निधी सहकारी पतसंस्थांमधील अनेक बेनामी खात्यांमध्ये रोख स्वरूपात जमा करून त्याचा गैरवापर केला जात होता.
  • ५ जिल्ह्यांत बेनामी साम्राज्य : अंधश्रद्धेच्या पैशातून बाबाने नाशिक, अहमदनगर, सोलापूर, पुणे आणि मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये कुटुंबाच्या नावावर जमिनी व मालमत्ता खरेदी केल्या.
  • सध्या न्यायालयीन कोठडीत : ईडीने १९ मे २०२६ रोजीच अशोक खरातला अटक केली असून, तो सध्या न्यायालयीन कोठडीत (जेलमध्ये) आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : २४ जुलै २०२६ – युवकांचा आक्रोश अन् राजकारणाचा बनाव

0
वैद्यकीय प्रवेशाच्या नीट परीक्षा पेपरफुटीचे पडसाद निकाल किंवा न्यायालयाच्या कक्षांपुरते मर्यादित न राहता, थेट देशातील रस्त्यारस्त्यांवर उमटले आहेत. लाखो तरुणांचे भविष्य अंधारात ढकलले गेल्याच्या...