Monday, November 23, 2026
Homeक्राईमNashik Crime News : उत्सवाच्या आड गुंडगिरी; तडीपार गुंडाची हप्ता न दिल्याने...

Nashik Crime News : उत्सवाच्या आड गुंडगिरी; तडीपार गुंडाची हप्ता न दिल्याने दहशत

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik 

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी रविवार पेठेतील गंगावाडी भागात (Gangawadi Area) गंगावाडी भक्त मित्र मंडळाने गणपतीचा हप्ता दिला नाही, म्हणून शहरातून तडीपार असलेल्या एका अट्टल गुंडाने साथीदारांसह परिसरात उघड तोडफोड, दगडफेक आणि लुटमार केली. या घटनेमुळे उत्सवाच्या उत्साहावर भीतीचे सावट पसरले असून, तडीपार गुन्हेगार शहरात वावरतोच कसा? असा प्रश्न उपस्थित करण्यात येताे आहे.

- Advertisement -

सोमवारी (दि. १४) रात्री नऊ वाजेच्या सुमारास गंगावाडी परिसरात नागरिक (Citizen) व कार्यकर्ते बाप्पाच्या स्थापनेच्या उत्साहात एकत्र आले होते. याच वेळी अवधूत जाधव, जयेश जाधव, राहुल दिघे आणि रोशन गांगुर्डे हे चौघे हातात चॉपर व चाकूसारखी धारदार शस्त्रे घेऊन आले. त्यांनी गल्लीत गाड्या पार्क करण्यासाठी दरमहा २ हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी करत नागरिकांना शिवीगाळ केली आणि वाहनांची तोडफोड सुरू केली. त्यानंतर मंडळाने गणपतीचा हप्ता दिला नाही असे म्हणत त्यांनी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला चढवला.

संशयित (Suspected) अवधूत जाधव याने चॉपरचा धाक दाखवून एका नागरिकाच्या खिशातून १,२०० रुपये बळजबरीने काढले. तर जयेश आणि रोशन यांनी चाकूचा धाक दाखवून शुभम मेटकर या तरुणाचे ५०० रुपये हिसकावले. प्रतिकार करणाऱ्या शुभमला दगडाने मारहाण करून जखमी करण्यात आले. तर, राहुल दिघे याने हप्ता दिला नाही तर कार्यक्रमच करेन, अशी धमकी देत नागरिकांवर दगडफेक केली. या धुडगुसात एमएच १५ डीपी ०१७१, एमएच १५ डीडी ६६६४ या दुचाकींसह इतर वाहनांचे सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले.

दोन संशयितांना अटक

स्थानिक व्यावसायिक विशाल चंद्रकांत आहेर यांच्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात चौघांविरोधात जबरी चोरी, खंडणी, प्राणघातक शस्त्रांचा वापर आणि तोडफोडीचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सागर डगळे तपास करत असून अवधूत जाधव व राहुल दिघे या दोघांना अटक केली असून उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे.

ताज्या बातम्या

Shrirampur : ‘ग्रो इन्व्हेस्टर’ फसवणूक प्रकरणातील आरोपी फरार माहिती देणार्‍यास पोलिसांकडून...

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur अल्पावधीत मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करणार्‍या ‘ग्रो इन्व्हेस्टर’ कंपनीच्या प्रकरणात अहिल्यानगर पोलीस दलाने पावले उचलली आहेत. गुन्ह्यातील...