Friday, October 2, 2026
Homeक्राईमNashik News: बोगस 'शालार्थ' च्या जामिनासाठी अर्ज; 'एवढ्या' संशयितांची एकत्रित सुनावणी होणार?

Nashik News: बोगस ‘शालार्थ’ च्या जामिनासाठी अर्ज; ‘एवढ्या’ संशयितांची एकत्रित सुनावणी होणार?

नाशिक । प्रतिनिधी
कोट्यवधी रुपयांच्या बनावट ‘शालार्थ आयडी मुळे शिक्षण व्यवस्थेत खळबळ उडालेली असताना, या प्रकरणातील सर्व संशयितांच्या जामीन अर्जावर ५ जानेवारी रोजी एकाच दिवशी सुनावणी होणार आहे. या प्रकरणात पाच स्वतंत्र गुन्हे दाखल असून, एकूण २५ जण तपासाच्या यादीत आहेत. या सर्व संशयितांनी स्वतंत्रपणे जामीन अर्ज दाखल केल्याने न्यायालयाने सर्व जामीन अर्ज एकत्रितपणे एकाच दिवशी सुनावणीस ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

तत्कालीन शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण हेही संशयित आहेत. त्यांना यापूर्वी न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला असून, आता त्यांच्या नियमित जामीन अर्जावरही ५ जानेवारी रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, तपासाच्या प्रारंभी चव्हाण हा प्रकरणातील फिर्यादी होता. मात्र, तपास पुढे जात असताना त्याच्या भूमिकेबाबत शंका निर्माण झाल्याने संशयितांच्या यादीत आला.

- Advertisement -

हे ही वाचा: Nashik Sinhastha News: सर्वतीर्थ टाकेद, कावनई, चक्रतीर्थचा होणार विकास; जिल्हा परिषदेवर जबाबदारी

दरम्यान, माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी जेलची हवा खाल्ल्यानंतर पुन्हा कारागृहात आहे. शालार्थ आयडी प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. हे पथक सखोल तपास करत असून, प्रकरणातील बहुतांश गुन्हे मालेगाव येथे दाखल आहेत. तपासासह कागदपत्रांत फेरफार केल्याच्या आरोपाने नाशिकरोड पोलीस ठाण्याचा तत्कालीन प्रभारी अशोक गिरी निलंबित आहे. शिक्षण विभागातील या संवेदनशील आर्थिक प्रकरणातील पुढील न्यायालयीन घडामोडींकडे आता लक्ष केंद्रित झाले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी एकाच दिवशी 92 उमेदवारांचे 100 अर्ज दाखल!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, गुरुवारी एकाच दिवशी 92 उमेदवारांनी 100 उमेदवारी अर्ज दाखल केले....