निफाड | प्रतिनिधी | Niphad
जिओ कंपनीचा फाईव्ह जी टॉवर तुमच्या शेतात (Farm) लावून देतो, असे आमिष दाखवून पावणे सोळा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील चितेगाव (ता. निफाड) येथील साहेबराव सुकदेव कानमहाले या शेतकऱ्याला ऑनलाईन पद्धतीने संपर्क साधून जिओ कंपनीचा फाईव्ह जी टॉवर तुमच्या शेतात लावून देतो, असे आमिषदाखवून संदीप शर्मा, पंकज माणिकराव यांनी १७ डिसेंबर ते १३ जानेवारीपर्यंत साहेबराव कानमहाले या शेतकऱ्याच्या विविध बँक खाल्यामधून १५ लाख ७८ हजार ११ रुपये ऑनलाईन स्वीकारून जिओ टॉवर लावून देतो, ही फक्त बतावणी करत पैसे उकळल्यानंतर जिओ टॉवर लावण्याची कुठलीही कार्यवाही न झाल्याने संशयित आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्यानंतर फोन बंद केले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे कानमहाले यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्याशी संपर्क साधून संशयित आरोपीविरोधात (Suspected) गुन्हा दाखल केला आहे. एका उच्चविभूषीत नागरिकाची साडेएकवीस लाखाला ऑनलाईन पद्धतीने (Online Fraud) फसवणूक केल्याची घटना नुकतीच घडली होती. तर ही परत दुसरी घटना घडली आहे.





