Wednesday, August 5, 2026
Homeक्राईमNashik Crime News : मालेगावी ६९ दुचाकीसह पाच चोरटे जेरबंद

Nashik Crime News : मालेगावी ६९ दुचाकीसह पाच चोरटे जेरबंद

मालेगाव | प्रतिनिधी| Malegaon

शहरातील कुंभारवाडा परिसरातील (Kumbharwada) एका घरा जवळील पत्र्याच्या शेड मध्ये लपवून ठेवलेल्या ५७ व १२ दुचाकी जप्त करीत पाच चोरट्यांना अटक (Arrested) केली आहे पोलिसांच्या गुन्हे शोध विभाग व वाहतूक पोलिस शाखेने ही कारवाई केली आहे. दरम्यान पत्र्याच्या शेडमध्ये जप्त केलेल्या दुचाकीच्या मालकाचा शोध प्रादेशिक परिवहन विभागाच्या मदतीने घेण्यात येत असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी दिली. जुगार खेळण्याच्या व्यसनाधिन असलेल्या या जुगारींच्या या दुचाकी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

कुंभारवाडा भागातील एका पत्र्याच्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकी संशयास्पद लपवून ठेवल्या असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांना मिळाली होती. या संदर्भात त्यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांना कारवाईचे आदेश दिले होते.पोलिस निरीक्षक पाटील व त्याच्या सहकाऱ्यांनी तेथे वाहतूक पोलिस व दंगा नियंत्रण पथकाच्या मदतीने छापा टाकला. यावेळी तेथे शेडमध्ये २७ तर जवळच ३० अशा ५७ दुचाकी संशयास्पद आढळून आल्या. या सर्व दुचाकी पोलिसांनी (Police) पोलिस नियंत्रण कक्षात आणल्या आहेत.

यातील बहुसंख्य दुचाकी बाहेरच्या जिल्ह्यातील नोंदणी क्रमांकाच्या असल्याचे समोर आले आहे. प्रत्येक दुचाकीची नंबर प्लेट, इंजिन व चेसीस क्रमांकांची पडताळणी सुरू असून प्रादेशिक परिवहन विभागाच्या मदतीने या वाहनांचा मूळ मालकाचा शोध घेतला जात आहे. कुंभारवाडा भागात एक संशयित जुगाराचा अड्डा चालवत आहे. जुगार खेळण्यासाठी येणाऱ्या व जुगारात पैसे हरलेल्या जुगारींच्या या दुचाकी असाव्यात तसेच क्लब चालकाने जुगाराच्या पैशाच्या बदल्यात त्या गहाण ठेवल्या असाव्यात असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, शहरासह परिसरातील विविध भागातून दुचाकी चोरटय़ांच्या टोळीच्या मुसक्या ही पोलिसांनी आवळल्या आहेत. गुन्हे शोध पथकाने शहरातून पाच दुचाकी चोरट्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीच्या १२ मोटारसायकल व एक सायकल असा ३ लाख ३५ हजार रूपयाचा ऐवज हस्तगत केला आहे. जलिल अहमद मोहंमद रईस (३० रा. म्हाडा प्लॉट) , मोहंमद साजिद खलिल अहमद (३०, आयेशानगर), अराफत अहमद जावेद अहमद ((२५), मोहंमद साबान मोहंमद सज्जाद हुसेन (२९) मोहम्मद साजिद मोहम्मद सलिम ही या चोरटयांची नावे असून ते सराईत दुचाकी चोरटे असल्याचे अप्पर पोलिस अधिक्षक गु॔जाळ यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Rahata : जायकवाडी नव्वदी पार! दरवाजे उघडले, विसर्ग सुरू

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata जायकवाडी जलाशयात काल सायंकाळी 6 वाजता 91.60 टक्के पाणी साठा झाला. या धरणातून काल मंगळवारी रात्री 7 वाजता 27 पैकी 18...