नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
जेलरोड परिसरातील (Jail Road Area) राहुल नगर या ठिकाणी असलेल्या पारा अव्हेन्यू सोसायटीमध्ये एक लिफ्ट तळमजल्यावरून चौथ्या मजल्यावर जात असताना वायर रोप तिसऱ्या मजल्याजवळ तुटल्याने लिफ्ट थेट तळमजल्यावर कोसळल्याची (Lift Collapse) घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन महिलांसह एक चार वर्षाचा बालक गंभीर जखमी झाला आहे.
गौरी अभिजीत मकवान (वय २४) हर्षित अभिजीत मकवान (वय ४) वैभवी मंगेश मकवान (वय १०) आणि मनस्वी मंगेश मकवान (वय ४) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू असून, यातील गौरी या तीन महिन्यांच्या बाळंतिणी आहेत. त्यांच्या मुलीच्या बारशाच्या कार्यक्रमादरम्यान ही दुर्घटना घडली.
हे देखील वाचा : Nashik TCS Case : चौकशीचा फेरा वाढला; राष्ट्रीय महिला आयोगाची समिती घटनास्थळी
सोसायटीतील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, मागील दोन महिन्यांपासून लिफ्टमध्ये वारंवार बिघाड होत होता. याबाबत बिल्डर किसन चंद्रकांत पोखर आणि संबंधित लिफ्ट कंपनीकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
दरम्यान, याप्रकरणी सोसायटीतील रहिवाशांनी बिल्डर किसन चंद्रकांत पोखर व लिफ्ट कंपनीच्या विरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात (Nashik Road Police Station) तक्रार दाखल केली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून, अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : बंदुकीच्या धाकावर संसार; पतीने पत्नीला पळवले





