Wednesday, May 20, 2026
Homeक्राईमNashik TCS Case : चौकशीचा फेरा वाढला; राष्ट्रीय महिला आयोगाची समिती घटनास्थळी

Nashik TCS Case : चौकशीचा फेरा वाढला; राष्ट्रीय महिला आयोगाची समिती घटनास्थळी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

बहुराष्ट्रीय आयटी कंपनी टीसीएसमधील महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक छळाच्या प्रकरणानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने (National Commission for Women) नेमलेली उच्चस्तरीय तथ्य शोध समिती नाशिकमध्ये (Nashik) तळ ठोकून आहे. रविवारी (दि. १९) या समितीने थेट कंपनीच्या आवारात जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. समितीत कायद्याच्या क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे.

- Advertisement -

मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव, हरियाणाचे या माजी पोलीस महासंचालक बी. के. सिन्हा, सर्वोच्च न्यायालयाच्या वकील मोनिका अरोरा आणि आयोगाच्या वरिष्ठ समन्वयक सुश्री लीलावती यांनी पीडित महिलांशी वैयक्तिक संवाद साधला. समितीने कंपनीचीच पाहणी केली नाही, तर नाशिक पोलिसांकडून आतापर्यंतच्या तपासाचा आणि पीडितांच्या जबाबांचा सविस्तर अहवालही घेतला आहे.

हे देखील वाचा : Devendra Fadnavis : विरोधकांकडून ७० कोटी महिलांचा विश्वासघात अन् विधेयकाची भ्रूणहत्या; CM फडणवीसांचा हल्लाबोल

दुसरीकडे, या प्रकरणातील मुख्य संशयित दानिश शेख याने याने कायदेशीर कचाट्यातून सुटण्यासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. त्याने दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयाने (Court) थेट २ मे रोजी होणार आहे. दरम्यानच्या काळात, दानिशचा इतर कोणत्या गंभीर गुन्ह्यांत सहभाग आहे का, याचा शोध एसआयटी घेत आहे. जामीन अर्जावर प्रदीर्घ तारीख मिळाल्याने पोलिसांना तपासासाठी संधी मिळाली आहे. या प्रकरणाचा अंतिम अहवाल केंद्राला सादर केला जाणार आहे. तर, एसआयटी, महिला आयोग यांच्या संयुक्त कारवाईतून काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

निदाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष

या प्रकरणातील महत्त्वाची संशयित निदा एजाज खान (Ejaj Khan) हिच्या जामीन अर्जावर आज, सोमवारी (दि. २०) महत्त्वपूर्ण सुनावणी होत आहे. निदा ही तीन महिन्यांची गर्भवती असल्याने, मानवी हक्कांच्या आधारावर तिला अटकेपासून संरक्षण मिळणार की पोलीस कोठडीत रवानगी होणार, याबाबत कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. एसआयटीने मुंब्रा येथे जाऊन तिच्या पतीचा जबाब नोंदवला असला तरी निदा अद्याप पोलिसांच्या (Police) हाती लागलेली नाही.

हे देखील वाचा : Bigg Boss Marathi Winner : कोकण कन्या तन्वी कोलते ठरली ‘बिग बॉस मराठी 6’ ची विजेती; ट्रॉफीसह किती पैसे मिळाले?

ताज्या बातम्या

Onion : कांदा दर घसरणीची केंद्राकडून गंभीर दखल; उच्चस्तरीय केंद्रीय पथक...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik विक्रमी उत्पादनानंतर कांद्याचे दर अक्षरशः कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना अखेर केंद्र सरकारने या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. ग्राहक...