Monday, September 28, 2026
Homeक्राईमNashik Crime News : बनावट ओळख सांगून ३१ लाखांची फसवणूक

Nashik Crime News : बनावट ओळख सांगून ३१ लाखांची फसवणूक

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

दुसरी व्यक्ती असल्याचे भासवून तसेच बनावट कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक अभिलेखांचा वापर करून उंटवाडीतील ४५ वर्षीय महिलेची तब्बल ३१ लाख २६ हजार ९० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात (Ambad Police Station) ब्रायन नावाच्या व्यक्तीसह त्याच्यासोबत असलेल्या अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोना जय राव (वय ४५, रा. सेंट्रल पार्क उंटवाडी, नाशिक) यांची ८ एप्रिल ते २७ जुलै २०२६ या कालावधीत फसवणूक (Fraud) झाली. संबंधित व्यक्तीने आपली ओळख लपवून दुसरी व्यक्ती असल्याचे भासविले. त्यानंतर फिर्यादीचा विश्वास संपादन करून विविध माध्यमातून त्यांच्याकडून एकूण ३१ लाख २६ हजार ९० रुपयांची रक्कम अथवा मालमत्ता मिळविल्याचे तक्रारीत नमूद आहे.

दरम्यान, फसवणुकीसाठी बनावट कागदपत्रे तसेच बनावट इलेक्ट्रॉनिक अभिलेख खरे असल्याचे भासवून त्यांचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने अंबड पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या तक्रारीवरून अंबड पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश नडविनकेरी पुढील तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

शेअर

शेअर बाजारात Black Monday; सेन्सेक्स १,१०० अंकांनी घसरला, निफ्टी २२,८०० खाली

0
मुंबई | Mumbaiआठवड्याच्या पहिल्याच व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात जोरदार घसरण झाली. जागतिक भू-राजकीय तणाव, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, अमेरिकेतील वाढते बॉण्ड यील्ड आणि...