Wednesday, September 2, 2026
Homeक्राईमNashik Crime News : सिडकोत दहशत पसरवण्यासाठी टाेळक्याचे फलक-पुराण; छेडछाडीसह कोयत्याचा वार

Nashik Crime News : सिडकोत दहशत पसरवण्यासाठी टाेळक्याचे फलक-पुराण; छेडछाडीसह कोयत्याचा वार

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

सिडको परिसरात (Cidco Area) नाशिक महानगरपालिका (Nashik NMC) आणि क्रीडा विभागाच्या अधिकृत फलकाची तोडफोड करत, त्या जागेवर कथित टाेळीतील टवाळखाेरांनी चक्क स्वतःच्या टोळीची जाहिरात केली आहे. स्वामी विवेकानंद नगरातील एस-२ सेक्टरमधील साईबाबा मंदिराजवळील खुल्या व्यायामशाळेत (ओपन जिम) हा प्रकार घडला. नागरिकांच्या आरोग्यासाठी उभारलेल्या या जिमवर ताबा मिळवत, एस-२ कंपनी नावाचा आणि दोन पिस्तुलांची चित्रे असलेला बॅनर लावण्यात आला होता.

परिसरात आपली दहशत आणि गँग (Gang) असल्याचे दाखवण्यासाठी संशयितांनी शासकीय साहित्याची तोडफोड करत हा कारनामा केला. अंबड पोलिसांच्या गोपनीय शाखेचे अंमलदार चेतन ठेपणे, उल्हास गांगुर्डे, मधुकर राव आणि शिवाजी मुंजाळ हे गस्तीवर असताना हा फलक-पुराणाचा प्रकार उघडकीस आला आणि पोलिसांनी तातडीने तो फलक हटवला. महापालिकेच्या बोर्डावर पिस्तुलाचे चित्र लावून दहशत माजवणारे हे गल्लीबोळातील भाई नक्की कोणाच्या आशीर्वादाने फोफावत आहेत, असा संतप्त सवाल आता सिडकोतील नागरिक विचारत आहेत. अंबड पोलिस आता या तथाकथित कंपनीचा पूर्ण बिमोड कसा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गुंडगिरीचा कंपनी पॅटर्न

केवळ फलक लावून हे संशयित थांबले नाहीत, तर याच तथाकथित एस-२ कंपनीच्या टवाळखाेरांनी परिसरात निर्लज्जपणाचा कळस गाठला. कौटुंबिक कारणावरून वाद घालत संशयित पीयूष ठाकूर याने एका अल्पवयीन युवतीची छेड काढली. मुलीच्या नातेवाइकांनी जाब विचारला असता, तुम्हाला एक-एकाला घरात घुसून मारेन, अशी धमकी देत या गुंडांनी थेट कोयते उपसले. ​संशयित साहिल सूर्यवंशी याने थेट फिर्यादीच्या डोक्यावर कोयत्याने प्राणघातक वार केला. सुदैवाने, प्रसंगावधान राखून त्यांनी वार चुकवल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी अंबड पोलिसांत रोहन गोठी, साहिल सूर्यवंशी, पियुष ठाकूर आणि ललित या संशयितांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

ताज्या बातम्या

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे उद्या नाशिक दौऱ्यावर

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे गुरुवारी दि.३) नाशिक दौऱ्यावर येत असून, आदिवासी बांधवांच्या विविध प्रश्नांसाठी सुरू...