नाशिकरोड | प्रतिनिधी
रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून सात ते आठ जणांच्या टोळक्याने तरुणावर हल्ला करून त्याच्या खिशातील रोख रक्कम लंपास के ल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात संबंधित टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार गुरुवारी (दि.६) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास सुभाषरोड, पवारवाडी भागात घडला. संदेश विष्णूवाघ (३१, रा. सुभाषरोड, पवारवाडी) यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते आणि सुनीता बाघ रात्री जेवण करून घराबाहेर उभे असताना संशयित टोनी पाईकराव ऊर्फ हर्ष सुरेश मस्के, गणेश पाईकराव, प्रथमेश कसबे, अनुराग हिरे ऊर्फ झम्प्या, दानिश शेख व त्यांचे इतर तीन ते चार साथीदार आले. टोनी आणि प्रथमेश यांनी त्याच्या पोटाला बंदूक लावून खिशातील ११०० रुपये बळजबरीने काढून घेतले तसेच शेजारी उभ्या असलेल्या रोहन जाधव याच्या खिशातूनदेखील ८०० रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेत सर्व संशयितांनी त्यांच्याजवळ असलेल्या धारदार शस्त्राने डोक्यात हल्ला करून गंभीर जखमी करत पलायन केले.
हे ही वाचा : Nashik News: मैंदच्या पोलीस पत्नीचा गुन्हे शाखेतच धिंगाणा; “मी पण पोलीस आहे…” अंमलदाराला धमकावलं, गुन्हा दाखल
वाघ यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयितांना ताब्यात घेतले असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी करत आहेत. दरम्यान, संशयित टोनी पाईकराव ऊर्फ हर्ष सुरेश म्हस्के याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल असून तो सध्या जामिनावर बाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




