Wednesday, August 26, 2026
Homeक्राईमNashik Crime News : प्रेम नाकारल्याने मुलीची आत्महत्या; प्रियकरासह नव्या प्रेयसीवर गुन्हा...

Nashik Crime News : प्रेम नाकारल्याने मुलीची आत्महत्या; प्रियकरासह नव्या प्रेयसीवर गुन्हा दाखल

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पूर्वाश्रमीचा प्रियकर आणि त्याच्या नवीन प्रेयसीने दिलेल्या छळाला कंटाळून एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना पेठ रोडवरील (Peth Road) पिंगळेनगर परिसरात घडली आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात (Mhasrul Police Station) प्रियकर व प्रेयसीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता दहावीत शिकत असताना संशयित (Suspected) दिशांत आहिरे याच्याशी तिची मैत्री झाली होती. दरम्यान, दिशांतचे ‘खुशी’ नावाच्या दुसऱ्या एका मुलीशीही प्रेमसंबंध जुळले. यानंतर दिशांत याने पीडितेला “माझा नाद सोडून दे, माझे खुशीसोबत प्रेमसंबंध आहेत” असे सांगून तिच्याकडे दुर्लक्ष करणे व मानसिक त्रास देणे सुरू केले. खुशी हिने देखील पीडित अल्पवयीन तरुणीची भेट घेऊन “तू दिशांतचा नाद सोडून दे” असे धमकावत व वाद घालत सातत्याने मानसिक त्रास दिला.

यानंतर, दोघांच्या सततच्या होणाऱ्या जाचाला व मानसिक त्रासाला कंटाळून सतरा वर्षीय तरुणीने (Young Woman) ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी पिंगळेनगर येथील राहत्या घरातील बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला आत्महत्येबाबत संशय व्यक्त करण्यात आला. आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सखोल तपास केला असता हा प्रकार समोर आला.

दोघांवर गुन्ह्याची नोंद

तपासानंतर २३ ऑगस्ट रोजी म्हसरूळ पोलीस ठाण्यात संशयित दिशांत आहिरे व खुशी (दोघे रा. नाशिक) यांच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक अतुल डहाके यांच्या सूचनेने उपनिरीक्ष म्हस्के करत आहेत. दोघांच्या अटकेची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Nashik Onion News : “रॅकमध्ये सडका अन् खराब…”; लासलगाव स्थानकात ‘कांदा...

0
लासलगाव | वार्ताहर | Lasalgoan देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर ६० ते ७० रुपये प्रति किलोवर पोहोचल्याने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) बफर स्टॉकमधून...