Thursday, October 1, 2026
Homeदेश विदेशNepal Flash Flood: नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार; १०५ भारतीयांसह ४०० भाविकांशी संपर्क तुटला

Nepal Flash Flood: नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार; १०५ भारतीयांसह ४०० भाविकांशी संपर्क तुटला

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
नेपाळमध्ये बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी पहाटे आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला आहे. रसुवा जिल्ह्यातील भोटेकोशी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे अनेक भागांमध्ये मोठी हानी झाली असून १०५ भारतीय नागरिकांसह ३८४ प्रवासी बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याच भागातून कैलास मानसरोवर यात्रेसाठी जाणाऱ्या सुमारे ४०० भाविकांशी संपर्क तुटल्याने चिंता आणखी वाढली आहे.

अचानक आलेल्या पुरामुळे मोठी दुर्घटना
नेपाळच्या रसुवा जिल्ह्यातील नेपाळ-चीन सीमेवरील रसुवागढी परिसरात सकाळी अचानक भोटेकोशी नदीला मोठा पूर आला. पुराच्या पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की नदीकाठची अनेक घरे, रस्ते आणि पायाभूत सुविधा बाधित झाल्या. काही भागांमध्ये संपर्क व्यवस्था विस्कळीत झाल्याने बचाव पथकांना घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी येत आहेत. प्राथमिक माहितीनुसार या आपत्तीत किमान आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, दुर्गम भागांशी संपर्क तुटल्याने मृतांचा आणि बेपत्ता नागरिकांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

मुंबईतील आमदारांचे प्रगतीपुस्तक समोर : विरोधकांची बाजी तर सत्ताधाऱ्यांची कामगिरी सुमार

४०० पर्यटक बेपत्ता
नेपाळ पर्यटन बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, या पुरात जवळपास ४०० पर्यटक बेपत्ता झाले असून त्यामध्ये २९१ परदेशी पर्यटक आणि ९० हून अधिक स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. नेपाळ न्यूज ने दिलेल्या माहितीनुसार बेपत्ता पर्यटकांमध्ये ३७ जण NRI आहे. तर उर्वरित पर्यटक नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, मेलिशिया, दक्षिण अफ्रिका आणि युनायटेड किंगड्म येथील असल्याची माहिती मिळत आहे.

मानसरोवरला निघालेल्या भाविकांना फटका
या दुर्घटनेचा सर्वाधिक फटका कैलास मानसरोवर यात्रेसाठी निघालेल्या भाविकांना बसला आहे. काठमांडूस्थित टच कैलाश ट्रॅव्हल्स अँड टूर्सचे व्यवस्थापकीय संचालक बासु कुमार अधिकारी यांच्या माहितीनुसार, बुधवारी चीनच्या सीमेवर जाण्यासाठी ९३ नेपाळी नागरिकांसह एकूण ३९० भाविक रसुवागढी परिसरात होते. मात्र दुपारपर्यंत मोजक्या भाविकांशीच संपर्क होऊ शकला होता. या भाविकांमध्ये विविध ट्रॅव्हल एजन्सींच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंचा समावेश आहे. संबंधित एजन्सी आणि स्थानिक प्रशासन भाविकांची माहिती गोळा करून त्यांची सद्यस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

भारतीय नागरिक बेपत्ता
या घटनेत १०५ भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची माहिती समोर आल्यानंतर भारताकडूनही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. बेपत्ता नागरिकांची ओळख पटवणे, त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करणे आणि सुरक्षित स्थळी हलवणे यासाठी संबंधित यंत्रणांकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, ३८४ प्रवाशांचा आकडा हा प्राथमिक असून तो अंतिम नाही. प्रभावित भागातील संपर्क व्यवस्था पूर्ववत झाल्यानंतर बेपत्ता व्यक्तींची संख्या आणि त्यांच्या स्थितीबाबत अधिक स्पष्ट माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

उत्तरगया ग्रामीण नगरपालिकेच्या उपाध्यक्षा चमेली गुरुंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुराचा सर्वाधिक फटका स्याफ्रुबेसी, बेत्रावती, मैलुंग, सल्लेतार, शांतीबाजार, पैरेबेसी, खल्ती बस्ती, सोले, त्रिशूली आणि बट्टार या भागांना बसला आहे. जीवित व वित्तहानीचा अधिकृत आकडा प्रशासनाकडून जाहीर झालेला नसला, तरी घटनास्थळावरील दृश्ये अत्यंत भयावह आणि मोठ्या जीवितहानीचे संकेत देणारी आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अर्ज घेण्यासाठी झुंबड; दाखल करणार्‍यांची मात्र प्रतीक्षा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना उमेदवारी अर्ज घेण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, अर्जांची विक्री मोठ्या प्रमाणात होत...