Thursday, October 15, 2026
Homeक्राईमNashik Crime News : शिंदे गावात १९ लाखांचा गुटखा, वाहन जप्त; एकावर...

Nashik Crime News : शिंदे गावात १९ लाखांचा गुटखा, वाहन जप्त; एकावर गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील शिंदे गाव परिसरात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक कारवाई (Action) करत ११ लाख ३९ हजार ६०० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. तसेच वाहतुकीसाठी वापरले जाणारे आठ लाख रुपयांचे महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनही ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत एकूण १९ लाख ३९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, राज इलियास सैय्यद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

कारवाईचा तपशील

गुप्तचर विभागाकडून (Intelligence Department) मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रविवारी (दि. ११) अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने शिंदे गावातील संबंधित ठिकाणावर छापा टाकला. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटख्याचा साठा आणि वाहतूक करणारे वाहन आढळून आले.नाशिक रोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ६०४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील (बीएनएस) कलम १२३, २२३, २७४ व २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अधिकारी वर्गाचा सहभाग

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे, सहआयुक्त मंगेश माने आणि नाशिकचे सहाय्यक आयुक्त एस. एस. देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये अन्न सुरक्षा अधिकारी प्रतिक भड, सुहास मंडलिक, श्रद्धा राहिंज आणि वैभव गर्दे यांच्या पथकाने सहभाग घेतला. प्रतिबंधित गुटख्याची विक्री व वितरणाविरुद्ध भविष्यातही अशीच कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

राहुल

‘कोणीही न्यायव्यवस्थेला दबावाखाली आणू शकत नाही’; राहुल गांधींना नोटीस, सुप्रीम कोर्टाची...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiलोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि INDIA आघाडीतील इतर नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नोटीस...