Thursday, September 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Crime News : पुरुषोत्तम कडलगसह लोंढे पिता-पुत्राचा कोठडीतील मुक्काम वाढला; जामीन...

Nashik Crime News : पुरुषोत्तम कडलगसह लोंढे पिता-पुत्राचा कोठडीतील मुक्काम वाढला; जामीन अर्जावरील सुनावणी ‘या’ तारखेला

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या (Trimbakeshwar Temple) बहुचर्चित व्हीआयपी दर्शन घोटाळा प्रकरणातील मुख्य संशयित आणि मंदिराचा विश्वस्त पुरुषोत्तम कडलग (Purushottam Kadlag) याच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. त्याच्या जामीन अर्जावरील नाशिक सत्र न्यायालयातील अत्यंत महत्त्वाची सुनावणी आता थेट २५ मे रोजी होणार आहे. सोमवारी (दि. १८) यावर निर्णय येण्याची शक्यता होती, मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे कडलगचा कारागृहातील मुक्काम आणखी काही दिवस वाढला असून, आता संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे लक्ष २५ मे रोजी होणाऱ्या सुनावणीकडे आहे.

- Advertisement -

पुरुषोत्तम कडलगच्या वतीने ८ मे रोजीच सत्र न्यायालयात (Court) जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. यापूर्वी ११ मे रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान पोलिसांनी बाजू आणि म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयाकडे मुदत मागून घेतली होती. त्यानंतर सोमवारी (दि. १८) होणारी सुनावणी पुढे गेल्याने कडलगला तूर्तास कोठडीतच रहावे लागणार आहे. याच घोटाळ्यातील अन्य संशयित ओम कडलग आणि अभिषेक कडलग यांना कनिष्ठ न्यायालयाने आधीच झटका दिला आहे. कनिष्ठ न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला असून, त्यांनी आता याविरोधात सत्र न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, अद्याप त्यांच्या वतीने सत्र न्यायालयात अधिकृतपणे जामीन अर्ज दाखल करण्यात आलेला नाही.

लोंढेच्या अर्जावर २६ मे रोजी निर्णय

सातपूर येथील ऑरा बारमधील गोळीबार आणि खंडणी प्रकरणातील काही मुख्य संशयितांच्या अडचणीदेखील कायम आहेत. पीएल ग्रुपचा म्होरक्या संशयित प्रकाश उर्फ बॉस लोंढे (Prakash Londhe) आणि दीपक उर्फ भाईजी यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी (Hearing) देखील पुढे ढकलण्यात आली आहे. नाशिक न्यायालयात (Nashik Court) आता या प्रकरणावर २६ मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : भुईकोट किल्ल्या विकास आराखडा कामाची घेतली माहिती

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नगर शहरालगतच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या संवर्धन आणि पर्यटनाच्यादृष्टीने मंजूर करण्यात आलेल्या कामांच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी किल्ल्याची...