Sunday, September 20, 2026
Homeक्राईमNashik Trimbakeshwar News : ट्रेकिंगसाठी आलेल्या पर्यटकांवर स्थानिक तरुणांचा हल्ला; चालकाला मारहाण...

Nashik Trimbakeshwar News : ट्रेकिंगसाठी आलेल्या पर्यटकांवर स्थानिक तरुणांचा हल्ला; चालकाला मारहाण करत पैशांची मागणी, तिघांना अटक

नाशिक | Nashik

महिनाभरापूर्वी त्र्यंबकेश्वर-घोटी मार्गावरील (Trimbakeshwar-Ghoti Road) बोरीची वाडी परिसरात मोटारसायकलला कट मारल्याच्या कारणावरून स्थानिकांनी पर्यटकांच्या वाहनाचा पाठलाग करत त्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी १० जणांविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात (Ghoti Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबई गावात कुटुंबासह ट्रेकिंगसाठी आलेल्या पर्यटकांच्या ग्रुपला काही तरुणांनी दादागिरी करत मारहाण आणि पैसे वसुली केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.

- Advertisement -

गाडीचा कट लागल्याचे सांगत भांडण उकरून काढले

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारच्या सुट्टीनिमित्त नाशिकमधील (Nashik) ट्रेकर्सचा एक ग्रुप वाहनातून अंबई डोंगरावर फिरण्यासाठी निघाला होता.यावेळी अंबई गावात (Ambai Village) नाशिकच्या ट्रेकर्स ग्रुपचे वाहन आल्यावर काही जणांनी त्यांचे वाहन अडवून पैशांची मागणी केली. तुमच्या गाडीने आमच्या गाडीला कट मारल्याने गाडीचे नुकसान झाल्याचे कारण सांगत टोळक्याने वाद घालण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकाराने ट्रेकर्सच्या वाहनांमधील सर्वच हादरले. यानंतर काही जणांनी उतरुन दुसऱ्या गाडीचे खरोखर नुकसान झाले आहे का? याची पाहणी केली असता कुठेही नुकसान झाल्याचे दिसले नाही. ट्रेकर्स ग्रुपने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर टोळक्याने आपल्या इतर साथीदारांना फोन करुन बोलावून घेतले. त्यांचे साथीदार आल्यानंतर त्यांनी ट्रेकर्स यांच्या वाहन चालकाला मारहाण करुन वाहनाबाहेर ओढण्यास सुरुवात केली. त्यानंतर ट्रेकर्स ग्रुपने त्यांना खडसावल्यावर ते सर्वजण पळून गेले.

त्र्यंबकेश्वर पोलिसांची त्वरित कारवाई

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून ट्रेकर्सच्या ग्रुपने प्रसंगावधान राखत तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलिसांनी (Trimbakeshwar Police) घटनास्थळी धाव घेत तीन संशयित तरुणांना ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

भुजबळांच्या कारवाईच्या सूचना

दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटनस्थळे असल्याने लोक याठिकाणी पर्यटनासाठी येतात. मात्र, काही चूक झाली असेल तर शांततेत मार्ग काढला पाहिजे. याबाबत स्थानिक पोलीसांनी काळजी घेत पेट्रोलिंग केले पाहिजे असे म्हणत नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांना त्वरित कारवाई करण्याची सूचना केली.

पर्यटकांना खबरदारी घेण्याचे आवाहन

नाशिक आणि परिसरात पर्यटकांना (Tourist) मारहाण झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर, ट्रेकिंग ग्रुप्स आणि पर्यटकांकडून निसर्गरम्य ठिकाणी जाताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अशा ठिकाणी प्रवास करताना सुरक्षेचा उपाय म्हणून स्थानिक पोलीस ठाण्याचे संपर्क क्रमांक नेहमी सोबत ठेवावेत, असा सल्ला पर्यटकांना देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता स्टँडअप कॉमेडियन बनावे – CM...

0
नागपूर | Nagpur मध्यप्रदेशातील इंदोरमध्ये शनिवारी (दि.१९) रोजी काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात कॉमेडियन पुलकित...