Thursday, May 14, 2026
Homeक्राईमNashik Crime News : माणुसकीला तेलाचा चटका; 'ती' आली, तेल मागितले आणि...

Nashik Crime News : माणुसकीला तेलाचा चटका; ‘ती’ आली, तेल मागितले आणि सुनेचा कोळसा करण्याचा प्रयत्न

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

माणुसकीच्या नात्याने दिलेली ओठातली मदत, काळजाला असा चटका लावेल असे कोणालाही वाटले नव्हते. म्हसरूळ परिसरातील (Mhasrul Area) यशोदानगरमध्ये शुक्रवारी (दि. १०) दुपारी जे घडले, ते एखाद्या थरारपटातील दृश्यापेक्षा कमी नाही. मावस सासूने स्कार्फ बांधून, ओळख लपवत स्वतःच्याच २० वर्षीय सुनेवर उकळते तेल (Boiling Oil) फेकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेने कौटुंबिक नात्यांमधील क्रूरतेचा एक नवा आणि धक्कादायक चेहरा समोर आला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : नाशिकच्या ‘निदा’ने रचले धर्मांतर कांड; न्यायालयात खुलासा, तीन नव्या पीडितांना धीर

यशोदा ज्ञानेश्वर गोसावी (वय ३६, रा. पिंपळगाव बसवंत) असे संशयित मावस सासूचे नाव आहे. पेठरोडवरील (Peth Road) मेहेरधाम भागात राहणाऱ्या ज्ञानेश्वरी राहुल गिरी (वय २०, रा. स्वामी श्रद्धा सोसायटी) या शुक्रवारी (दि.१०) सासू पद्मा यांच्यासह घरात जेवण करत होत्या. त्यांचे पती कामावर गेले होते. दुपारी १:३० वाजेच्या सुमारास घराची बेल वाजली. ज्ञानेश्वरी यांनी दरवाजा उघडला असता, समोर एक महिला चेहऱ्याला स्कार्फ बांधून उभी होती. त्या महिलेने आपली ओळख मी तुमच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या गोसावी यांची पुतणी आहे अशी करून दिली. ‘आम्ही पापड बनवत आहोत, गॅस संपला असून मला थोडे तेल गरम करून द्या, अशी विनंती ज्ञानेश्वरी यांना केली.

हे देखील वाचा : Nashik Crime News : बहुराष्ट्रीय कंपनीतील धर्मांतर रॅकेट; छळवणुकीला ‘एचआर’ ची साथ, महिलेस पुण्यातून अटक

माणुसकीच्या नात्याने ज्ञानेश्वरी यांनी त्या महिलेकडून (Women) तेलाचे पातेले घेतले आणि स्वयंपाकघरात नेऊन तेल गरम केले. ज्ञानेश्वरी यांनी एकदा तेल गरम करून दिले, मात्र तेल अजून हवे तसे कडक झाले नाही, असे सांगून त्या महिलेने पुन्हा तेल गरम करण्यास भाग पाडले. ज्ञानेश्वरी पुन्हा किचनमध्ये गेल्या आणि तेल गरम करून घेऊन आल्या. जेव्हा त्या हे उकळते तेल त्या महिलेला देऊ लागल्या, तेव्हा संशयित महिलेने अचानक तेलाच्या पातेल्याला खालून जोरात धक्का दिला. यामुळे गरम तेल ज्ञानेश्वरी यांच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर उडाले. यावरच न थांबता, ज्ञानेश्वरी यांचा गळा दाबून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वरी यांच्या सासूने हा प्रकार पाहताच आरडाओरड केली.

हे देखील वाचा : Nashik Accident News : दुर्दैवी घटना! जागरण गोंधळाचा कार्यक्रम आटोपून परतताना आयशर ट्रक-पिकअपचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, अनेक जखमी

घटनेची माहिती मिळताच डायल ११२ चे पथक आणि उपनिरीक्षक क्षीरसागर घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ज्ञानेश्वरी यांना रुग्णालयात दाखल केले. ज्ञानेश्वरी या सुमारे ३० टक्के भाजल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. म्हसरूळ पोलिसांनी (Police) यशोदा गोसावीविरुद्ध गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. हा हल्ला नेमका कोणत्या वादामुळे किंवा कारणावरून करण्यात आला, याचा तपास पोलीस करत आहेत.

नागरिकांची सतर्कता

ज्ञानेश्वरी यांच्या ओरडण्यामुळे आणि सासूच्या आवाजामुळे परिसरातील नागरिक तातडीने मदतीला धावून आले. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या त्या महिलेला नागरिकांनी जागीच पकडले. संशय आल्याने जेव्हा तिच्या तोंडाचा स्कार्फ काढण्यात आला, तेव्हा ती महिला ज्ञानेश्वरी यांची मावस सासू संशयित यशोदा ज्ञानेश्वर गोसावी (वय ३६, रा. पिंपळगाव बसवंत) असल्याचे उघड झाले. यशोदा हिला देखील पती व मुलगे असून तिने हा प्रकार का केला, याचा सखोल तपास सुरु आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : खरातची ‘मॅनेजमेंट’ गँग; पंधरा गुन्ह्यांनंतरही ‘मॅनेजमेंट टीम’ एसआयटीच्या रडारबाहेरच!

ताज्या बातम्या

पडसाद : स्वेच्छानिवृत्तीचा दुष्काळात तेरावा!

0
'नाव सोनूबाई हाथी कथलाचा वाळा' ही म्हण नाशिकच्या महापालिकेला सध्यातरी तंतोतंत लागू पडते. कारण राज्यातील काही मोठ्या महापालिकांमध्ये नाशिकची गणना होते. सुमारे साडेतीन हजार...